बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये 10 दिवसांचं अंतर आहे. या दरम्यान भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियन पीएम इलेव्हनशी झाला. हा गुलाबी चेंडूनं खेळण्यात आलेला सराव सामना होता. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानेस यांनी दोन्ही संघांची वैयक्तिक भेट घेतली. या भेटीनंतर एका मुलाखतीत त्यांनी विराट कोहलीच्या फॅन फॉलोइंगबद्दल मोठा खुलासा केला. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी सांगितलं की, त्यांचे वैयक्तिक डॉक्टर विराट कोहलीचे मोठे चाहते आहेत.
अँथनी अल्बानेस यांनी नुकतीच विराट कोहलीची भेट घेतली. त्यादरम्यान त्यांनी कोहलीबद्दल त्यांच्या आणि त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांना किती आदर आहे हे सांगितलं. अल्बानेस यांनी सांगितलं की त्यांचे डॉक्टर विराट कोहलीचे मोठे चाहते आहेत आणि त्यांनी विराटचा ऑटोग्राफ मागितला होता. ते ‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना म्हणाले, “विराट कोहलीबाबत माझ्या डॉक्टरांची क्रेझ शब्दांच्या पलीकडची आहे. जेव्हा मी विराटला भेटणार असल्याचं सांगितलं तेव्हा त्यांना विश्वास बसला नाही. त्यांनी मला कोहलीचा ऑटोग्राफ घेण्यास सांगितलं.”
पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं शानदार खेळी केली. त्यानं दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियातील आपलं 7वं शतक झळकावलं. विराट कोहलीनं 143 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या आणि टीम इंडियाला 295 धावांनी विजय मिळवून दिला. मात्र विराट कोहली भारत विरुद्ध पीएम इलेव्हन या गुलाबी चेंडूच्या सराव सामन्यात खेळला नाही. त्याऐवजी तो जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनसोबत नेट्समध्ये सराव करताना दिसला.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये होणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना आहे, जो गुलाबी चेंडूनं खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान खेळला जाणार आहे.
हेही वाचा –
जसप्रीत बुमराह इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर, अशी कामगिरी करणारा बनेल जगातील पहिला गोलंदाज!
अजिंक्य रहाणे होणार केकेआरचा पुढील कर्णधार? आयपीएल 2025 पूर्वी मोठं अपडेट जाणून घ्या
“भारतात जा आणि भारताला हरवून या”, पाकिस्तानी दिग्गजाची संघाकडे स्पेशल मागणी