आयपीएलच्या मैदानात सोमवारी (10 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. आरसीबीला या सामन्यात शेवटच्या चेंडूवर पराभव स्वीकारावा लागला. सामन्यात अनेक प्रसंग असे घडले, ज्यावर चाहत्यांना ह्रदयाचा ठोका चुकला. ईम्पॅक्ट प्लेअरच्या रूपात लखनऊसाठी फलंदाजीला आलेला आयुष बदोनी याने संघासाठी महत्वाच्या धावा केल्या. पण आपल्याच चुकीमुळे त्याला विकेट गमवावी लागली. परिणामी विजयासाठी लखनऊला शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला.
लखनऊला या सामन्यात जिंकलण्यासाठी 213 झावांचे लक्ष्य मिळाले होते. मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांच्या वादळी खेळीच्या जोरावर लखनऊने हा सामना जिंकला. असे असले तरी, आरसीबीने देखील फलंदाजी आणि नंतर गोलंदाजी करताना जबरदस्त प्रदर्शन केले. आयपीएलमध्ये नव्याने आमलात आलेल्या इम्पॅक्ट प्लेअर नियमानुसार लखनऊने अमित मिश्राच्या जागी आयुष बदोन (Ayush Badoni) याला मैदानात बोलावले. लक्ष्याचा पाठलाग करताना बदोनीने 24 चेंडूत 30 धावा केल्या. खेळपट्टीवर चांगल्या पद्धतीने सेट झाल्यानंतर बदोनला 19व्या षटकात स्वतःच्याच चुकीमुळे विकेट गमवावी लागली.
वेगवान गोलंदाज लखनऊसाठी 19व्या षटकात गोलंदाजीला आला होता. त्यावेळी लखनऊची धावसंख्या 6 बाद 198 धावा होती आणि विजयासाठी संघाला 12 चेंडूत 15 धावा हव्या होत्या. षकातील तिसऱ्या चेंडूवर बदोनीने चौकार मारला, तर पाचव्या चेंडूवर चेंडू थेट षटकारासाठी खेळला. बदोनीने षटकातील पाचव्या चेंडूवर फाइन लेगच्या दिशेने षटकार मारला, पण याच चेंडूवर आपली विकेट देखील गमावली. हा शॉट खेळत अशताना आयुष ऑफ स्टंप्सच्या पूर्णपणे बाहेर निघाला होता. त्याने खाली बसून मागच्या दिशेने षटकार मारला, पण याच वेळी त्याची बॅट स्टंप्सला लागली. परिणीम पंचांनी त्याला बाद म्हणून घोषित केले आणि संघाला षटकाराच्या सहा धावाही मिळाल्या नाहीत.
Ayush Badoni ramps one for six but ends up getting hit wicket #IPL2023 #RCBvsLSG https://t.co/swT3zFwmBq
— Vikash Gaur ???????? (@thevikashgaur) April 11, 2023
दरम्यान, बदोनीने विकेट गमावली नसती, तर लखनऊसाठी विजय जास्त कठीण ठरला नसता. कारण या विकटेनंतर शेवटच्या षटकात हर्षल पटेने मार्क वूड आणि जयदेव उनाडकट यांना बाद केले. शेवटच्या चेंडूवर संघाला एक धाव हवी होती. आवेश खान आणि रवी बिश्नोई ही शेवटची जोडी खेळपट्टीवर होती. हर्षलने टाकलेला शेवटचा चेंडू आवेश खानला खेळता आला नाही. पण यष्टीरक्षक दिनेश कार्तिक हा चेंडू पकडताना गडबडला आणि फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली. कार्तिकची ही चूक आरसीबीच्या पराभवास कारणीभूत ठरली. (Ayush Badoni hit wicket against Royal Challengers Bangalore)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीची स्टाईल मारायला निघालेला कार्तिक, पण शेवटच्या चेंडूवर बिघडवला सगळा गेम
क्रिजच्या बाहेर असूनही बिश्नोनी नाबाद! आरसीबीच्या पराभवात हर्षल पटेलची ‘ही’ चूकही कारणीभूत