श्रीलंकन संघाला सोमवारी (6 नोव्हेंबर) बांगलादेश संघाविरुद्ध 3 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. अँजेलो मॅथ्यूज आणि एकंदरीत श्रीलंकन संघासाठी ही लढाई प्रतिष्ठेची झाली होती. पण अखेर बांगलादेशने सामना जिंकला. असे असले तरी शाकीब अल हसन आणि मॅथ्यूज यांच्यातील घमासान पाहाण्यासारखी ठरले.
शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकन संघ 49.3 षटकांमध्ये 279 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात बांगलादेशने 280 धावांचे लक्ष्य 41.1 षटकात 7 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. बांगलादेशचा हा विश्वचषक हंगामातील अवघा दुसरा विजय ठरला, तर श्रीलंकेला सहावा पराभव स्वीकारावा लागला. उभय संघांतील याय सामन्यात अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याला पंचांनी टाईम आऊट नियमानुसार बाद घोषित केले. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने खेळाडू वृत्तीचा जराही विचार न करता विकेटसाठी अपील केली आणि मॅथ्यूजला विकेट गमवावी लागली.
Moment of the World Cup.
Mathews saying “It’s time to go” after taking the wicket of Shakib. pic.twitter.com/DSZmHZtWHE
— Johns. (@CricCrazyJohns) November 6, 2023
शाकिबला या वर्तनासाठी सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल केले गेले. पण श्रीलंकेच्या डावात मॅथ्यूजने स्वतः हिशोब बरोबर केला. बांगलादेशच्या डावातील 32व्या षटकात मॅथ्यूज गोलंदाजीला आला. षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने स्ट्राईकवर असलेल्या शाकिबाला गुड लेंथ चेंडूवर चरिथ असलंका याच्या हातात झेलबाद केले. खरा रोमांच इथून पुठे पाहायला मिळाला. विकेट घेतल्यानंतर मॅथ्यूजने डाव्या हाताच्या मनगटाकडे इशारा करत शाकिबला खुनावले. त्याने एकप्रकारे ‘तुझी देखीव वेळ झाली’, असा संदेशच यावेळी शाकिबला दिला. पहिल्या डावात अवघ्या काही सेकंदांमुळे मॅथ्यूजला विकेट गमवावी लागल्यामुळे त्याने असा ईशारा केला, असेही काहीजण सांगत आहेत. मॅथ्यूजची ही रिएक्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
???? A real story of life, As you sow, so shall you reap.
Proved by Shakib and Angelo Mathews.#AngeloMathews pic.twitter.com/E58OlV72bV
— Haroon ???????? (@HaroonM33120350) November 6, 2023
दरम्यान, बांगलादेशच्या विजयात कर्णधार शाकिब अल हसनचेच योगदान सर्वोत्तम होते. शाकिबने अवघ्या 65 चेंडूत 82 धावा केल्या. मजमुल हसेन शांतो यानेही 101 चेंडूत 92 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तत्पूर्वी पराभूत झालेल्या श्रीलंकेसाठी चरिथ असलंका याने 105 चेंडूत 108 धावा कुटल्या होत्या. (SA vs BAN Angelo Mathews takes revenge on Shakib Al Hasan by showing his wrist watch)
महत्वाच्या बातम्या –
CWC 2023: अखेर बांगलादेशचाच नागिण डान्स! श्रीलंका वर्ल्डकपमधून ‘आऊट’
रियान परागला भेटणार टीम इंडियात संधी? ‘या’ दिवशी करणार आंतरराष्ट्रीय पदार्पण