सध्या अफगाणिस्तान संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जात असून, मालिकेतील दुसरा सामना सिल्हेट येथे खेळला गेला. पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी 17 षटकांच्या झालेल्या या सामन्यात यजमान बांगलादेश संघाने 6 गडी राखून विजय मिळवला. यासह त्यांनी मालिका देखील आपल्या नावे केली. मालिकेतील पहिला सामन्यात देखील त्यांनी विजय मिळवला होता.
https://www.instagram.com/p/Cuw-u05ucVZ/?igshid=MzRlODBiNWFlZA==
उभय संघातील मालिकेतील पहिला सामना अत्यंत रोमहर्षक झाला होता. ज्यामध्ये एक चेंडू राखून बांगलादेश संघाने विजय मिळवलेला. या दुसऱ्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने सामना प्रत्येकी 17 षटकांचा केला गेला. प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या अफगाणिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. त्यानंतर इब्राहिम झादरान व नबी यांनी अनुक्रमे 22 व 16 धावा केल्या. मध्यफळी देखील फारशी यशस्वी ठरली नाही. त्यानंतर करीम जनत व अझमतुलाह यांनी उपयुक्त योगदान देत संघाला 166 पर्यंत पोहोचवले. बांगलादेशसाठी तस्कीन अहमद याने सर्वाधिक तीन तर शाकीब मुस्तफिझूर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघाला लिटन दास व अफीफ होसेन यांनी 67 धावांची शानदार सलामी दिली. दोघांनी अनुक्रमे 35 व 24 धावा केल्या. शांतो चार धावा करून माघारी गेल्यानंतर तोहीदने 19 व शाकिब अल हसनने नाबाद 18 धावा करत संघाचा विजय साकार केला. जास्त एक सामना शिल्लक असतानाच बांगलादेशने ही मालिका खिशात घातली आहे.
(Bangladesh Best Afghanistan In Second ODI By 6 Wickets)
महत्वाच्या बातम्या –
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ च्या रोमांचक सामन्यांचा आनंद घेतला
बेअरस्टोच्या विवादित स्टंपिंगवर ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाची मोठी प्रतिक्रिया! म्हणाला, ‘मी आधीही असं…’