जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आता अवघ्या ५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ कसोटी क्रिकेटमधील पहिल्यावाहिल्या जागतिक स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी आमनेसामने असतील. १८ ते २२ जून दरम्यान हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाईल.
या सामन्यासाठी आता दोन्ही संघांनी कसून तयारी सुरू केली आहे. भारतीय संघ ३ जूनला इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर कोरोना प्रतिबंधक नियमावली अंतर्गत त्यांनी विलगीकरणाचा निर्धारित कालावधी पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी सरावाला सुरुवात केली. या सरावाचे विविध व्हिडिओ आयसीसी आणि बीसीसीआयच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांसमोर येत होते. आत्ताही असाच एक खास व्हिडिओ समोर येतो आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भारतीय कर्णधार दिसला गोलंदाजी करतांना
भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली हा आजच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याचे फलंदाजी कौशल्य तर वादातीतच आहे. मात्र कारकिर्दीच्या सुरुवातीला कोहली कामचलाऊ मध्यमगती गोलंदाजी देखील करत असे. मात्र नंतर त्याने गोलंदाजी करणे बंद केले.
मात्र आता बीसीसीआयने भारतीय संघाचा इंग्लंडमधील सरावाचा व्हिडिओ शेअर केला असून ज्यात चक्क विराट कोहली गोलंदाजी करतांना दिसून येत आहे. भारतीय संघाने खेळलेल्या इंट्रा-स्क्वाड सामन्यात कोहली गोलंदाजी करतांना दिसून आला. त्यामुळे न्यूझीलंड विरुध्द अंतिम सामन्यात देखील कोहली गोलंदाजी करणार का, या चर्चेला उधाण आले आहे.
Captain vs Captain at the intra-squad match simulation.
What do you reckon happened next?
Straight-drive
Defense
LBW#TeamIndia | @imVkohli | @klrahul11 pic.twitter.com/n6pBvMNySy— BCCI (@BCCI) June 12, 2021
खरंतर, इंग्लंडमधील वातावरण हे स्विंग गोलंदाजांसाठी पोषक असते. अशा वातावरणात मध्यमगती कामचलाऊ गोलंदाज उपयुक्त ठरु शकतो. गोलंदाजांना मोठ्या स्पेल मधून विश्रांति देण्यासाठी असा गोलंदाज उपयोगी पडू शकतो. ही भूमिका कोहली आपल्या गोलंदाजीने निभावू शकतो. त्यामुळे आता येत्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोहली गोलंदाजी करतांना दिसला, तर आश्चर्य वाटायला नको.
महत्त्वाच्या बातम्या:
मायदेशात इंग्लंडवर पराभवाची नामुष्की, न्यूझीलंडने ८ विकेट्सने दुसरी कसोटी जिंकत मिळवला मालिका विजय
कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा डंका! इंग्लंडविरुद्धच्या मालिका विजयाने गाठले ‘हे’ स्थान
टी२० क्रिकेट मोठं झालं! १८ वर्षांपूर्वी ‘या’ दोन संघांत खेळला गेला होता पहिला टी२० सामना