भारताचे माजी महान फूटबाॅलपटू व क्रिकेटपटू चुन्नी गोस्वामी(Chuni Goswami) यांचे गुरुवारी निधन झाले. कार्डियाक अरेस्टमुळे (Cardiac Arrest) त्यांचे वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले.
त्यांनी बंगालकडून ४७ तर भारताकडून ५० फूटबाॅलचे सामने खेळले होते. त्यांना भारतीय फूटबाॅल वर्तुळात मोठा मान होता. ते भारताकडून १९५६ ते १९६४ या काळात फूटबाॅल खेळले. ते क्लब फूटबाॅल १९५४ ते १९६८ या काळात मोहन बगान क्लबकडून खेळले. Former India Footballer Chuni Goswami Dies At 82.
चुन्नी गोस्वामी यांनी १९६२साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय फूटबाॅल संघाचे नेतृत्त्वही केले होते. या स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक जिंकले होते. १९६४ साली त्यांनी आशिया कपमध्ये भारताला रौप्य पदक मिळवुन दिले होते. १९६३मध्ये त्यांना क्रीडा जगतात मानाचा समजला जाणारा अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता. त्यांना १९८३मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
ते काॅलेज जिवनात कोलकाता विद्यापीठाचे फूटबाॅल व क्रिकेट संघाचे कर्णधार होते.
क्रिकेटमध्येही घडवली होती कारकिर्द-
त्यांनी फूटबाॅलमधून निवृत्ती घेतल्यावर क्रिकेटकडे मोर्चा वळवला होता. त्यांनी वयाच्या २७व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय फूटबाॅलला अलविदा केला होता. त्यांनी १९६२ ते १९७३ या काळात बंगाल संघाकडून ४६ प्रथम श्रेणी सामने खेळले. यात त्यांनी २८.४२च्या सरासरीने १५९२ धावा तर २४.०८च्या सरासरीने ४७ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यांनी बंगाल संघाला आपल्या नेतृत्त्वाखाली रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेले होते. १९७१-७२ हंगामात त्यांच्याच नेतृत्त्वाखाली बंगाल संघाचा ब्रेबाॅर्न स्टेडियमवर रणजी फायनलमध्ये पराभव झाला होता.
इंदोर येथे मध्य व पश्चिम विभागाने १९६६मध्ये गॅरी सोबर्स यांच्या वेस्ट इंडिज संघाला धुळ चारली होती. त्यावेळी त्यांनी ८ विकेट्स घेतल्या होत्या.
वाचनीय लेख-
-त्यांचा स्वत:चा मुलगा भारताकडून खेळू शकला नाही परंतु रोहितला मात्र त्यांनी घडवले
-रोहित शर्माकडे एकेकाळी शाळेची फी भरायलाही नव्हते पैसे, अशी भागवायचा गरज
-खेळाडू म्हणून ५ पैकी ५ आयपीएल फायनल जिंकणारा रोहित जगातील एकमेव खेळाडू