fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारतातून परतलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या कोरोना टेस्टचा आला निकाल

मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. मात्र या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर पुढील दोन्ही सामने कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन रद्द करण्यात आले. यानंतर दक्षिण आफ्रिका संघ कोलकाता आणि दुबईमार्गे मायदेशी परतला.

त्यानंतर या सर्व खेळाडूंना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर या खेळाडूंची टेस्ट करण्यात आली व सर्व खेळाडूंची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. कोणत्याही खेळाडूत कोरोनाची लक्षणं दिसली नाहीत.

या संघाचे मुख्य चिकित्सा अधिकारी असलेल्या शोएब मांजरा यांनी ही माहिती दिली. १८ मार्च रोजी दक्षिण आफ्रिका संघ मायदेशी परतला होता. गुरुवारी या संघाने क्वारंटाईनचा कालावधी पुर्ण केला. तरीही ते हा आठवडा वेगळे राहणार आहेत.

“कोणत्याही खेळाडूमध्ये कोरोनाचे कोणतेच लक्षण दिसले नाहीत. ज्या खेळाडूंची टेस्ट करण्यात आली त्यांची टेस्टही निगेटिव्ह आली आहे,” असे यावेळी मांजरा यांनी सांगितले. Coronavirus: South African cricketers symptom-free after returning from India tour.

सध्याच्या ट्रेंडिंग घडामोडी- 

आयपीएलबद्दलची ही आहे सर्वात मोठी बातमी, जाणून घ्या कधी होणार आयपीएल

कोरोना बाधीतांच्या मदतीसाठी कुणाला माहित होऊ न देता दान करणारे ४ क्रिकेटपटू

पाकिस्तानच्या क्रिकेटपटूची युवी-भज्जीकडे मदतीची याचना

भारताकडून केवळ १ कसोटी खेळलेला खेळाडू करतोय ३५० मजदूरांची मदत

You might also like