मुंबई । आयपीएल सुरू होण्यापूर्वी 18 ऑगस्टपासून सुरू होणार्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या (सीपीएल) आठव्या हंगामाचा आनंद घेण्याची संधी क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंची जितकी दमदार कामगिरी दिसते तितकी सीपीएलमध्येही दिसते. आज आम्ही तुम्हाला त्या टॉप -5 फलंदाजांची नावे सांगणार आहोत ज्यांनी सीपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.
1. ख्रिस गेल – 2354 धावा
विंडीजचा सलामीवीर ख्रिस गेल हा टी 20 प्रकारातला सर्वात स्फोटक फलंदाज मानला जातो. तो सीपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 76 सामन्यांच्या 74 डावात 39.23 च्या सरासरीने 2354 धावा केल्या आहेत. त्यामध्ये तो 14 वेळा नाबाद आहे. त्याचा स्ट्राइक रेट 133.44 आहे. याशिवाय 4 शतकांसह त्याने 13 अर्धशतके आहेत.
सीपीएलमध्ये इतर कोणत्याही फलंदाजाने इतकी शतके केली नाहीत. एवढेच नव्हे तर त्याच्या नावावर सर्वाधिक षटकार देखील आहे. गेलने 162 षटकार लगावले आहेत. मात्र, यावेळी गेल सीपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. गेलचा सेंट लुसिया जक्सबरोबर करार होता. पण कुटुंबासाठी त्यांने ब्रेक घेतला आहे.
2. लेंडल सिमन्स – 2080 धावा
सीपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसर्या स्थानावर विंडीजचा फलंदाज लेंडल सिमन्स आहे. 2013 मध्ये सुरू झालेल्या या लीगचे सर्व सामने त्याने खेळले आहेत, त्यादरम्यान त्याने आतापर्यंत खेळलेल्या 71 सामन्यांच्या 69 डावांमध्ये 33.01 च्या सरासरीने 2080 धावा केल्या आहेत, त्यामध्ये तो 6 वेळा नाबाद आहे. त्याचा स्ट्राइक रेट 120.09 आहे. याशिवाय त्यांच्या नावावर 16 अर्धशतकांची नोंद आहे. सीपीएलमध्ये आतापर्यंत अन्य कोणत्याही फलंदाजाने इतकी अर्धशतके केले नाही. इतकेच नाही तर त्याच्या नावावर 105 षटकारांसह 168 चौकार आहेत.
3. आंद्रे फ्लेचर – 1870 धावा
विंडीजचा टॉप ऑर्डर फलंदाज आंद्रे फ्लेचर हा सीपीएलमध्ये धावा वेगात काढण्यासाठी प्रसिद्ध आहे. या लीगमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत तो तिसर्या स्थानावर आहे. फ्लेचरने आतापर्यंत खेळलेल्या 66 सामन्यांमध्ये 31.16 च्या सरासरीने 1870 धावा केल्या असून त्यामध्ये तो 6 वेळा नाबाद आहे. त्याचा स्ट्राइक रेट 117.31 आहे. याशिवाय त्याच्या नावावर 11 अर्धशतके आहेत.
फ्लेचरची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 84 अशी होती. इतकेच नाही तर त्याने 148 चौकारासोबत 84 षटकारही नोंदवले आहेत. फ्लेचर यावेळी सेंट लुसिया जोक्सकडून खेळताना दिसणार आहे.
4. जॉन्सन चार्ल्स – 1842 धावा
यष्टीरक्षक फलंदाज जॉन्सन हा सीपीएलमधील सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू आहे. चार्ल्सने आतापर्यंत खेळलेल्या 68 सामन्यांमध्ये 27.90 च्या सरासरीने 1842 धावा केल्या असून त्यामध्ये तो 2 वेळा नाबाद राहिला आहे. त्याचा स्ट्राइक रेट 130.36 आहे. याखेरीज त्याने 9 अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या 97 होती. त्याचबरोबर त्याच्या नावावर 160 चौकारासह 80 षटकारांची नोंद देखील आहे. चार्ल्स हा बार्बाडोस ट्रिडंट्सच्या संघाचा भाग आहे.
5. चाडविक वॉल्टन – 1779 धावा
सीपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत उजव्या हाताचा फलंदाज चाडविक वॉल्टन हा पाचव्या स्थानावर आहे. वॉल्टनने आतापर्यंत खेळलेल्या 73 सामन्यांमध्ये 26.55 च्या सरासरीने 1779 धावा केल्या आहेत, त्यामध्ये तो 6 वेळा नाबाद आहे. त्याचा स्ट्राइक रेट 121.68 आहे. याखेरीज त्याने 9 अर्धशतके केली आहेत.
चार्ल्सची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 94 अशी होती. त्याच्या नावावर 173 चौकार आणि 79 षटकारांची नोंद आहे. यावेळी हा फलंदाज जमैका तैलवाहसाठी खेळताना दिसेल.
ट्रेंडिंग लेख –
भारताचे असे ५ धुंव्वादार फलंदाजी करणारे ओपनर, ज्यांचं नाव ऐकलं तरी गोलंदाजांची टरकायची
आयपीएल २०२० मध्ये ह्या ५ अष्टपैलू खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष
क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ऍशेज
महत्त्वाच्या बातम्या –
६ वर्षांपासून आयपीएलमध्ये न खेळणाऱ्या पुजाराच्या नावावर आहे हा मोठा विक्रम; विराट- रोहितही आहेत मागे
दिग्गज म्हणतोय, या गोलंदाजांमध्ये दिसतोय वकार, वसीमची आक्रमकता
५ वर्षांपुर्वी बेन स्टोक्सने टाकलेल्या ‘त्या’ एका चेंडूची जगाने घेतली दखल