दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी कर्णधार एबी डिविलियर्सने त्याला भीती वाटणाऱ्या भारतीय गोलंदाजांची नावे सांगितली आहेत. तो नुकताच इंस्टाग्रामवर लाईव्ह आला होता. यादरम्यान त्याने याची माहिती दिली. यावेळी त्याने सांगितले की, त्याला एक नाही, दोन नाही तर तब्बल ४ भारतीय गोलंदाजांची भीती वाटते.
टी२० क्रिकेटमध्ये यॉर्करकिंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सर्वात घातक गोलंदाज आहे. बुमराहच्या यॉर्कर गोलंदाजीमुळे जागतिक दर्जाचे फलंदाजही चिंतेत पडतात, असे डिविलियर्स (AB De Villiers) म्हणाला.
तसेच वनडे क्रिकेटमध्ये त्याला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची (Mohammed Shami) भीती (Fear) वाटत असल्याचे त्याने सांगितले. शमी मागील काही काळापासून मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत आहे. मागील वर्ष तर त्याच्याच नावावर होते. त्याने आपल्या गोलंदाजीने मैदान गाजवले होते.
तर कसोटी क्रिकेटमध्ये दोन भारतीय गोलंदाजांचा सामना करणे कठीण असल्याचे डिविलियर्सने सांगितले. यावेळी त्याने फिरकीपटू गोलंदाज रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि आर अश्विनला (R Ashwin) घातक गोलंदाज म्हणून निवडले.
डिविलियर्सने आतापर्यंत एकूण ११४ कसोटी सामने, २२८ वनडे सामने आणि ७८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने कसोटीत ८७६५, वनडेत ९५७७आणि टी२०त १६७२ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-खूप जास्त अपेक्षा असताना भ्रमनिरास केलेले ७ क्रिकेटपटू
-धोनी स्वभावाने खूप चांगला, जगात असा उदार मनाचा खेळाडू नाही पाहिला
-काहीही न सांगता मला टीममधून बाहेर केलं, मित्र कोहलीनेही केली नाही मदत