मुंबई ।स्टेडियममध्ये क्रिकेट फॅन्स मोठ्या संख्येने असल्यास खेळाडूंमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. क्रिकेट फॅन्स नेहमीच खेळाडूला सपोर्ट करत असतात. जर क्रिकेट फॅन्सच्या अनुपस्थितीत सामने होत असतील तर त्यांना आम्ही खूप मिस करू, असे मत भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने व्यक्त केले आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटचे सामने दर्शकांविना खेळण्याचा प्रस्ताव पुढे आला होता, त्यावेळी भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन हा श्रीलंकन अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूज यांच्यासोबत इंस्टाग्रामवर लाइफवर बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
शिखर धवन आयपीएलच्या बाबतीत बोलताना म्हणाला की, यंदाच्या वर्षात आयपीएलच्या स्पर्धा होईल ही आशा देखील त्याने व्यक्त केली आहे. प्रत्येक ठिकाणी सुरक्षेची काळजी घेणे जरुरी आहे. यंदा आयपीएलचे सामने झाले तर मी अनेक नव्या सकारात्मक गोष्टी आणेन. मी नेहमी सकारात्मक विचार करतो असे केल्याने मला आनंद होतो.