न्यूझीलंडचा संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आला आहे. लॉर्ड्स येथे झालेला पहिला कसोटी सामना ५ विकेट्सने गमावल्यावर न्यूझीलंड नॉटींघम येथे दुसरी कसोटी खेळत आहे. यामध्ये न्यूझीलंडचा संघ नियमित कर्णधार केन विलियमसनच्या अनुपस्थितीत मैदानात उतरला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी एक घटना घडली आहे. त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डेरिल मिशेल फलंदाजीला आलेला असता त्याने मारलेल्या शॉटने एका प्रेक्षकाची पूर्ण बियर खाली सांडली आहे. झाले असे की, ५६व्या षटकामध्ये मिशेलने षटकार मारला असता तो थेट स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकाच्या हातात असलेल्या बियरच्या ग्लासमध्ये पडला. त्या चेंडूमुळे ग्लासमधील पूर्ण बियर खाली सांडली. इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डने (इसीबी) या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे.
इसीबीने ‘प्लीज नवीन पेय द्या’, असे कॅप्शन टाकत शेयर केले आहे. या व्हीडिओमध्ये जॅक लीचच्या गोलंदाजीवर मिशेलने पुढे येऊन षटकार मारला. यावेळी सीमारेषेवर उभा असलेल्या मॅथ्यू पॉट्सने बियरच्या ग्लासमध्ये चेंडू पडला असा इशाराही केला आहे.
https://www.instagram.com/reel/CeoTqvODaQz/?utm_source=ig_web_copy_link
सुझन असे त्या महिला प्रेक्षकाचे नाव असून न्यूझीलंडच्या संघाने तिला दुसरा नवीन ग्लासही दिला आहे. याचे फोटोज इंग्लंडच्या बार्मी आर्मीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेयर केल्या आहेत.
Susan – the lady earlier who Daryl Mitchell’s pint hit – has been given a replacement by the Kiwi team 👏👏👏#ENGvNZ pic.twitter.com/53ig2R5cML
— England's Barmy Army 🏴🎺 (@TheBarmyArmy) June 10, 2022
मिशेलने सामन्याचा दिवस संपल्यावर सुझनची भेट घेतली असून तिची माफी मागितली आहे. त्याचा व्हीडिओ न्यूझीलंड क्रिकेटने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेयर केला आहे.
Sorry Susan!#ENGvNZ https://t.co/tqzhuh6SO6 pic.twitter.com/yajycEupL2
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 10, 2022
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम (Tom Latham) आणि सलामीवर विल यंग यांनी सामन्याला चांगली सुरूवात केली. दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टोक्सने आक्रमक गोलंदाजी करत फलंदाजांसाठी अडथळे निर्माण केले. दोघांनी या सामन्यात प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या आहेत.
मिशेलप्रमाणे भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि आताच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनेही (Rahul Dravid) आपल्या फलंदाजीने प्रेक्षकाची बियर वाया घालवली आहे. त्याने २००७च्या इंग्लंड दौऱ्यात ब्रिस्टोल येथील वनडे सामन्यात फलंदाजी करताना अँडरसनच्या गोलंदाजीवर षटकार (फ्लॅट सिक्स) मारला असता तो चेंडू प्रेक्षकाच्या बियर ग्लासला लागला. या सामन्यात द्रविडने ६३ चेंडूत नाबाद ९२ धावा केल्या होत्या. हा सामना भारताने ९ धावांनी जिंकला होता.
Since the video of Daryl Mitchell destroying a cricket fan's beer pint is going viral, here's Rahul Dravid doing it with a flat six.pic.twitter.com/vL37u8KSzN
— TheRandomCricketPhotosGuy (@RandomCricketP1) June 11, 2022
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस संपला असता न्यूझीलंडने ४ बाद ३१८ धावा धावफलकावर जोडल्या आहेत. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाला असता खेळपट्टीवर मिशेल नाबाद ८५ आणि टॉम ब्लण्डेल नाबाद ७३ धावांवर खेळत आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लईच वाईट राव! ५ विस्फोटक भारतीय खेळाडू, पण त्यांच्या नशिबात वर्ल्डकपची एकही मॅच नव्हती
बाबर आजमची चूक पाकिस्तानला भलतीच भोवली, विरोधी संघाला मिळाल्या तब्बल ‘एवढ्या’ धावा
क्रिकेटमधील ‘त्या’ सर्वात ऐतिहासिक सामन्याला आज ११५ वर्षे पूर्ण