आयपीएल २०२१ मध्ये शनिवारी (२४ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) असा सामना खेळला गेला. राजस्थानने ६ गड्यांनी विजय साजरा करत गुणतालिकेत सहाव्या स्थानावर मजल मारली. या पराभवामुळे केकेआर संघ अखेरच्या स्थानावर पोहोचला. संघाच्या खराब कामगिरी सोबतच युवा सलामीवीर शुबमन गिल हा देखील झगडताना दिसतोय. मात्र, संघाचा मेंटर डेव्हिड हसी याने गिलची पाठराखण केली आहे.
हसीने केली गिलची पाठराखण
राजस्थान विरुद्धच्या सामन्यात शुबमन गिल पुन्हा एकदा अपयशी ठरला. या सामन्यात तो केवळ ११ धावा बनवू शकला. त्यानंतर, अनेकांनी गिलवर टीका करण्यास सुरुवात केली. मात्र, संघाचा मेंटर डेव्हिड हसीने गिलची पाठराखण केली.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तो म्हणाला, “शुबमन हा स्टार खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियात त्याने चांगली कामगिरी केली होती. नेट्समध्ये देखील तो घाम गाळत असतो. तो खास खेळाडू आहे. खेळाडू फॉर्ममध्ये असो किंवा नसो त्याचा दर्जा कायम असतो. त्याच्यामध्ये नैसर्गिक प्रतिभा आहे. तुम्ही लिहून घ्या, माझ्यामते स्पर्धा संपेपर्यंत शुबमन स्पर्धेतील सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंमध्ये समाविष्ट असेल.”
खराब फॉर्ममध्ये आहे शुबमन
आयपीएल २०२१ मध्ये शुबमन गिल आणि केकेआर दोघांचीही कामगिरी निराशाजनक होत आहे. केकेआरला पाचपैकी चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला असून, ते गुणतालिकेत सर्वात खालच्या क्रमांकावर आहेत. तसेच, गिल या पाच सामन्यांमध्ये केवळ ८० धावा काढण्यात यशस्वी झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पाच सामन्यात दोन अर्धशतके; मॅक्सवेलच्या कामगिरीबद्दल दिग्गज म्हणाला, “त्याच्या यशाने अचंबित झालोय”
पोलार्डचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर; म्हणाला,”मी उत्तर देत नाही याचा अर्थ…”
आईच्या हातचा घास, बहिणीची प्रेमळ मिठी अन् बाबांची शिकवण; कुटुंबीयांच्या आठवणीत सुंदर झाला भावुक