fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकून देणाऱ्या दोघा दिल्लीकरांना मिळाली सुपर भेट

Delhi Capitals Changed Their Tweeter Handle Name To Stoinis And KG Fan Account

September 21, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे काल (२० सप्टेंबर) आयपीएल २०२०मधील दूसरा सामना पार पडला. दिल्ली कॅपिल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात खेळण्यात आलेला हा सामना खूप रोमांचक ठरला. या सामन्यात दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये दमदार विजय मिळवला. या विजयासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या २ खेळाडूंचे दिल्ली संघाने खूप गजब प्रकारे कौतुक केले आहे. दिल्लीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटचे पुर्वीचे नाव बदलून नवे नाव ठेवले आहे. Delhi Capitals Changed Their Tweeter Handle Name To Stoinis And KG Fan Account

झाले असे की, सुरुवातीला पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्ली संघाने २० षटकांत ८ बाद १५७ धावा केल्या. एकवेळ ३ बाद १३ अशी अवस्था असलेल्या संघाला पुढे कर्णधार श्रेयस अय्यर व यष्टीरक्षक रिषभ पंतच्या फलंदाजीने सावरले. त्यानंतर पुन्हा ६ बाद ९६ अशा मोठ्या संकटात संघ सापडला.

पण त्यानंतर ६व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मार्कस स्टोयनीसने मात्र जोरदार धमाका केला. त्याने केवळ २१ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्याच्या या अफलातून प्रदर्शनामुळेच संघाला १५७ धावांचा स्कोर उभा करता आला.

एवढेच नव्हे तर, या धुरंदर अष्टपैलू खेळाडूने गोलंदाजी करतानाही आपली कमाल दाखवली. पंजाब संघ दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना त्याने ३ षटके गोलंदाजी करत २९ दिल्या. दरम्यान त्याने पंजाबचा डाव एका बाजूने पुढे नेत असलेल्या मयंक अगरवालला हेटमायरच्या हातून झेलबाद केले. तर सामन्यातील शेवटच्या चेंडूवर अटीतटीची परिस्थिती असताना ख्रिस जॉर्डनला बाद करत, त्याने सामना बरोबरीत सोडला. त्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली.

स्टोइनिसबरोबर दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यानेही अपेक्षेप्रमाणे शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले. त्याने गोलंदाजी करत असताना ग्लेन मॅक्सवेल आणि कृष्णप्पा गौतम यांची विकेट तर चटकावलीच. पण त्याने सुपर ओव्हरमध्ये शानदार गोलंदाजी प्रदर्शन करत संघाला एकहाती सामना जिंकून दिला. त्याने सुपर ओव्हरमध्ये केवळ २ धावा देत निकोलस पूरन आणि केएल राहुल यांच्या विकेट्स घेतल्या.

त्यामुळे दिल्लीच्या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या या २ खेळाडूंचे सर्वांनीच खूप कौतुक केले. स्टोइनिसला तर त्याच्या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने देखील गौरवण्यात आले. पण आपल्या संघाला पहिल्याच सामन्यात घवघवीत यश मिळवून देणाऱ्या स्टोइनिस आणि रबाडाचे कौतुक करण्यासाठी संघाने वेगळी पद्धत वापरली. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटचे जुने नाव बदलून ‘स्टोइनिस आणि केजी फॅन अकाउंट’ असे ठेवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

अतिशय प्रतिष्ठीत क्रिकेट स्पर्धा मुंबईतील या ६ स्टेडियमवर घ्या, पहा कुणी केलीय मागणी

कसोटीत त्रिशतक, वनडेत द्विशतक व टी२०त शतक करणाऱ्या जगातील एकमेव क्रिकेटरचा आज आहे बड्डे

पृथ्वी शॉच्या त्या एका कृतीमुळे शिखर धवन झाला अवाक्

ट्रेंडिंग लेख –

पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दिल्लीचे ‘हे’ ५ खेळाडू खेळले नसते तर काही खरं नव्हतं

१३ वा आयपीएल हंगाम गाजवणार हे ३ भारतीय गोलंदाज, मिळणार सर्वाधिक बळी?

आयपीएलच्या मागील ३ हंगामातील रोहित शर्माची कामगिरी, घ्या जाणून


Previous Post

अतिशय प्रतिष्ठीत क्रिकेट स्पर्धा मुंबईतील या ६ स्टेडियमवर घ्या, पहा कुणी केलीय मागणी

Next Post

ज्याच्या फिटनेसची सर्वात जास्त चर्चा होती, तोच खेळाडू झालाय आता फिट

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

कचरा वेचणारा मुलगा ते ‘युनिव्हर्स बॉस’

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास

January 27, 2021
Screengrab: Instagram/@radhika_dhopavakar
टॉप बातम्या

क्वारंटाईनमध्ये रहाणे घालवतोय मुलीसोबत वेळ, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@JamshedpurFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सची जमशेदपूरची गोलशून्य बरोबरी

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

वनक्कम टीम इंग्लंड! जो रूटचा संघ पोहोचला चेन्नईत

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@TheRealPCB
टॉप बातम्या

कराची कसोटीत पाकिस्तानला आघाडी, फवाद आलमचे संघर्षपूर्ण शतक

January 27, 2021
Next Post
Image- RR Facebook

ज्याच्या फिटनेसची सर्वात जास्त चर्चा होती, तोच खेळाडू झालाय आता फिट

Photo Courtesy: Twitter/IPL

सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंलगोर सामन्यात असे आहेत दोन्ही संघ

Photo Courtesy: Twitter/IPL

नकोसा विक्रम करण्यात आरसीबीचा कुणी हात धरत नाही, पहा काय केलाय नवा विक्रम

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.