क्रिकेटच्या सर्वात छोट्या स्वरूप, टी20 क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणे हे कोणत्याही क्रिकेटपटू आणि क्रिकेटप्रेमीसाठी आश्चर्याचा धक्काच असेल. परंतु अशी एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. दिल्लीचा क्रिकेटपटू सुबोध भाटीने हा विक्रम केला आहे. सुबोधने दिल्ली इलेव्हन संघाकडून जबरदस्त खेळी केली आहे. सुबोधच्या या उत्कृष्ट खेळीमुळे सर्वच क्रिकेटप्रेमींचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले आहे.
सुबोधने सिम्बा संघाविरुद्धच्या टी20 सामन्यामध्ये ही कामगिरी केली आहे. इतकेच नव्हे तर त्याने युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचाही विक्रम मोडीत काढला आहे.
क्लब टी20 सामना खेळत सुबोधने नाबाद 205 धावा केल्या. त्याच्या या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याने फक्त 17 चेंडूत 102 धावा केल्या. म्हणजेच 17 चेंडूंवर 17 षटकारांचा पाऊस पाडत शतकाहून अधिक धावा जमवल्या. याव्यतिरिक्त त्याने 17 चौकारही मारले. सुबोधने क्लब टी20 सामन्यात सलामीला फलंदाजी करताना ही झुंजार खेळी केली व तो डावाखेर नाबाद पव्हेलियनला परतला.
रणजी क्रिकेटपटू सुबोधच्या संघाने वीस षटकअखेर एकूण 256 धावा केल्या. त्याने विरोधी संघाच्या गोलंदाजांना जोरदार धुऊन काढले आणि 250 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. सुबोधच्या संघाने 20 षटकांत एका विकेटसाठी 256 धावा केल्या. यामध्ये सुबोधचे योगदान 205 धावांचे होते; तर बाकीच्या दोन फलंदाजांनी एकूण 31 धावांची भागीदारी केली.
https://www.instagram.com/p/CQ3xJ-BM_TY/?utm_source=ig_web_button_share_sheet
टी20 क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, चटकन सर्वांच्या मुखात ख्रिस गेल, आंद्रे रसेल, विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स अशी काही नावे येतात. क्रिकेटच्या या छोट्या स्वरूपात ख्याती असलेल्या गेलच्या नावे अनेक मोठ्या विक्रमांची नोंद आहे. त्यातीलच टी20 स्वरुपात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या विक्रम सुबोधने मोडला आहे. गेलने 2013 मध्ये पुणे वॉरियर्सकडून सर्वोच्च नाबाद 175 धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! ‘बॅट शेजाऱ्याची बायको असते’ म्हणणे दिनेश कार्तिकला पडले महागात, आई अन् पत्नीने खूप ऐकवलं
‘त्याला’ श्रीलंकाविरुद्ध ६ पैकी ६ सामन्यात खेळताना पाहायचंय; बड्या भारतीय क्रिकेटपटूची इच्छा
जेव्हा जडेजा अन् रैनामध्ये झाले होते कडाक्याचे भांडण, ‘असा’ मिटला होता वाद