युरोपियन क्रिकेट लीग स्पर्धा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनून आहे. या स्पर्धेत असे काही मजेशीर प्रसंग घडत आहेत, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अशातच बुखारेस्ट ग्लेडियेटर्स विरुद्ध बनासा यांच्यात झालेल्या सामन्यात एका खेळाडूने असे काही हटके सेलिब्रेशन केले आहे, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक असे क्रिकेटपटू आहेत जे आपल्या हटके सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध आहेत. शतक झळकावल्यानंतर, झेल टिपल्यानंतर किंवा गडी बाद केल्यानंतर हे खेळाडू हटके सेलिब्रेशन करताना दिसून येतात. यात ख्रिस गेल, तबरेज शम्सी, शिखर धवन, ड्वेन ब्रावो यांचा समावेश आहे. परंतु युरोपियन क्रिकेट लीग स्पर्धेत गोलंदाज पावेल फ्लोरिनने असे काही सेलिब्रेशन केले आहे, जे पाहून या दिग्गज खेळाडूंनाही हसू आवरणार नाही.
तर झाले असे की, ९ वे षटक टाकण्यासाठी पावेल फ्लोरिन गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर पावेल फ्लोरिनने फलंदाजाला गोंधळात टाकले. त्याने संथ गतीचा चेंडू टाकला, जो फलंदाजाला कळालाच नाही. तो चेंडू बॅटचा कडा घेत यष्टिरक्षकाच्या हातात गेला आणि फलंदाज बाद झाला. या विकेटचा जल्लोष साजरा करण्यासाठी गोलंदाज पावेल फ्लोरिनने थेट समालोचन कक्षाच्या दिशेने वाट धरली होती. त्यानंतर गोलंदाजाने समालोचकासोबतच जल्लोष साजरा केला.(European cricket series Bucharest Gladiators Bowler Pavel florin funny celebration)
Live the moment #cricket pic.twitter.com/k9cbtmKUrE
— Pavel Florin (@PavelFlorin13) July 24, 2021
तसेच या सामन्याबाबत बोलायचं झालं तर, या सामन्यात बुखारेस्ट ग्लेडियेटर्स संघाने बनासा संघावर ७ गडी राखून विजय मिळवला. पावेल फ्लोरिनने या सामन्यात १ षटक गोलंदाजी केली. यामध्ये त्याने ८ धावा खर्च करत २ गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
शांत स्वभावाचा द्रविडही भारतीय संघातील ‘त्या’ खेळाडूचा चुकिचा फटका पाहून असा वैतागला
SLvIND: त्यांनी माझ्या डोक्यावरचा भार हलका केला; कर्णधार धवनने ‘या’ २ खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय
भुवीने उद्ध्वस्त केला श्रीलंकेचा डाव, ४ विकेट्स घेत ‘ही’ अतुलनीय कामगिरी करणारा ठरला केवळ दुसराच