fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कुलदिप यादव असा पराक्रम करणारा केवळ दुसराच चायनामन गोलंदाज

सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आज (6 जानेवारी) पावसाच्या व्यत्ययामुळे 25.2 षटकांचाच खेळ होऊ शकला आहे. आज चौथ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद 6 धावा केल्या आहेत.

या डावात भारताकडून चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने 5 विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका कसोटी सामन्यात 5 विकेट्स घेणारा कुलदिप जगातील दुसराच डाव्या हाताचा फिरकीपटू(चायनामन गोलंदाज) ठरला आहे.

यावेळी कुलदिपने 99 धावा देत पाच विकेट्स पटकावल्या आहेत. याआधी इंग्लंडचे फिरकीपटू जॉनी वॉर्डल यांनी 1955ला सिडनीमध्येच 79 धावा देत पाच विकेट्स पटकावल्या होत्या. त्यांनी कारकीर्दीत 28 कसोटी सामने खेळताना 102 विकेट्स घेतल्या असून दोन अर्धशतकांसह 653 धावाही केल्या आहेत.

याचबरोबर कुलदिप आशिया खंडाबाहेर तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पाच विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे.

आज (6 जानेवारी) चौथ्या दिवसाच्या सामन्यात भारताकडून कुलदिप यादवने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात नॅथन लायन आणि जोश हेझलवूड यांना पायचीत करत दुसऱ्यांदा कसोटीत पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. याआधी त्याने राजकोट येथे झालेल्या विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 57 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या होत्या.

कुलदिपने ट्रेंट ब्रीजवर झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात 25 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. तर ओल्ड ट्रॅफोर्डवर झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 24 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियाच्या बाबतीत ती गोष्ट कधीच नाही घडली

कोणत्याच भारतीय गोलंदाजाला जमले नाही ते कुलदिप यादवने केले

३३ वर्षांनंतर थायलंडवर विजय मिळवण्यास टीम इंडिया उत्सुक

कोहलीच्या टीम इंडियाने सहाव्यांदा दिला विरोधी संघाला फॉलोऑन, काय आहे याआधीचा इतिहास?

You might also like