fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

‘या’ देशात खचाखच प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये सुरु झाले फुटबॉल सामने

मुंबई । कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने जगातील सर्वच क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. त्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जगातील सर्वात मोठी फुटबॉल लीग अजून सुरू झालेली नाही. मात्र जेव्हा सुरू होईल तेव्हा या लीगचे सर्व सामने प्रेक्षका विना खेळवण्यात येणार आहे. याचदरम्यान एका देशात खचाखच दर्शकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये फुटबॉलचे पुनरागमन झाले आहे.

कोरोना विषाणूमुळे व्हिएतनाम या देशात सर्वच फुटबॉल स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. शुक्रवारपासून या फुटबॉल स्पर्धेला पुन्हा सुरुवात झाली आहे. व्ही लीगमध्ये हो ची मिन्ह सिटी आणि हाइ पोंग यांच्यात झालेला पहिला सामना अनिर्णीत झाला. हा सामना पाहण्यासाठी हजार प्रेक्षक उपस्थित होते.

व्हिएतनाम या देशांमध्ये या देशाने कोरोना विषाणूवर यशस्वीपणे मात केली आहे. येथे केवळ 318 लोकांना बाधा झाली होती. कोरोनामुळे या देशात आतापर्यंत कुणाचेही निधन झाले नाही.

स्टेडियमच्या क्षमतेपेक्षा अर्ध्या लोकांनाच सामना पाहण्यासाठी केवळ प्रवेश देण्यात आला होता. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सोडण्यापूर्वी त्यांचे तापमान तपासण्यात आले. सामना पाहण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले नव्हते. हा सामना पाहण्यासाठी हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती.

पहिल्या दिवशी एकूण तीन सामने खेळवण्यात आले. द कोंग  आणि नाम दिन्ह या सामन्यासाठी तीन हजार लोक स्टेडियममध्ये उपस्थित होते तर साय गोन एफसी आणि बिन्ह डुओंग यांचा सामना पाहण्यासाठी आठशे लोक उपस्थित होते.

हो चिन्हचे प्रशिक्षक जुंग हाय सुंग म्हणाले की, ” दर्शकांच्या समोर फुटबॉल खेळण्याची मजा खूप वेगळीच आहे. यातून खूप आनंद मिळतो. आम्ही खूप आनंदी आहोत. हेच फुटबॉलला वेगळे बनवते. लीग पुन्हा सुरू होण्याची खूप दिवसांपासून वाट पाहत होतो.”

You might also like