fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारतासाठी आनंदाची गोष्ट, २०२१मध्ये भारतात होणार विश्वचषकाचे आयोजन

Football U17 Women Fifa World Cup in India Rescheduled due to Covid-19 Pandemic

कोविड-१९ या साथीच्या आजारामुळे जवळपास सर्वच क्रीडा स्पर्धा स्थगित किंवा करण्यात आल्या आहेत. परंतु स्थगित करण्यात आलेला १७ वर्षांखालील फीफा महिला विश्वचषक आता पुढील वर्षी भारतात १७ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२१दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.

जागतिक फुटबॉलची सर्वोच्च संस्था फीफाने (इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबाॅल) कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सखोल आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी या स्पर्धेचे आयोजन यावर्षी २१ नोव्हेंबर २०२०पासून होणार होते. परंतु जागतिक कोरोना व्हायरसमुळे मागील महिन्यात ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.

फीफाने (FIFA) घोषणा केली की, स्पर्धेतील मूळ पात्रतेचा निकष कायम राहील आणि अशा प्रकारे १ जानेवारी २००३ किंवा नंतर आणि ३१ डिसेंबर २००५ किंवा त्यापूर्वी जन्मलेल्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी दिली गेली आहे.

फीफाने सांगितले की, “कोविड-१९ (Covid-19) साथीच्या आजाराचा प्रभाव आणि फीफा संघ कोविड-१९ कार्य समूहाच्या शिफारसीच्या सखोल मुल्यांकनानंतर फीफा परिषद ब्यूरोने स्पर्धेच्या नवीन तारखांना मंजूरी देण्याचा निर्णय घेतला आहे.” या स्पर्धेत एकूण १६ संघ भाग घेतील आणि याचे आयोजन ५ ठिकाणी करण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-कसोटीत ठरले जगातील ५ महान खेळाडू, पण वनडे करियर संपलं अचानक

-एका टी२० सामन्यात सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारे ५ फलंदाज

-धोनी आज जो आहे तो केवळ ‘त्या’ गोष्टींमुळेच

You might also like