सोमवारी (दि. 31 जुलै) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस 2023 मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना लंडनमध्ये पार पडला. हा सामना इंग्लंडने 49 धावांनी जिंकला. या विजयासह मालिका 2-2ने बरोबरीत सुटली. अशात मोठी बातमी समोर येत आहे. इंग्लंड संघाचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकने पुनरागमनाविषयी मोठे विधान केले आहे. त्याच्या या खुलास्याने क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे.
काय म्हणाला कूक?
ऍलिस्टर कूक (Alastair Cook) म्हणाला आहे की, मागील 2 आठवड्यांपासून त्याला असे काही स्वप्न पडत आहेत, ज्यामध्ये तो स्वत:ला क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना पाहत होता. त्याने असेही म्हटले की, त्याने ही गोष्ट गांभीर्याने घेतली होती की, नेट्समध्ये त्याने पुन्हा सराव करण्यास सुरुवात केली होती. तसेच, आपल्या फिटनेसवरही काम करणे सुरू केले होते.
खरं तर, कूकने 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. माध्यमांशी बोलताना कूक म्हणाला की, “मागील दोन आठवड्यांमध्ये अनेक वर्षांनंतर मला पाच वेळा अशी स्वप्न पडली की, मी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. माझी पत्नीने यावर म्हटले की, आता बास खूप झाले. मी अँडरसन, रूट आणि ब्रॉडला फोन करून याबाबत सांगितले. हे खूपच विचित्र आठवडे होते.”
“मी कुठल्याही कारणाशिवाय सकाळी 5 वाजता कुठलाही विचार न करता धावू लागायचो. मी जिम्मी अँडरसनशी बोललो. मात्र, माझ्या डोक्यात कुठे ना कुठे हे नेहमी होते की, क्रिकेटमध्ये पुनरागमन चांगले नसते. मात्र, अँडरसनने मला 15 यशस्वी अशी उदाहरणं पाठवली, जे चांगले होते. त्यानंतरही मी व्यावहारिक विचार करून निर्णय घेतला. तसेच, व्यावहारिक विचाराचा विजय झाला आणि कारण मी नेट्समध्ये पुन्हा खेळण्यास सुरुवात केली, पण इथे अधिक विचार केल्यानंतर मला समजले की, नाही, हे खूपच वेगळे आहे,” असे तो पुढे बोलताना म्हणाला.
याव्यतिरिक्त तो असेही म्हणाला की, “ज्याप्रकारे मी 2018मध्ये ओव्हलमधून बाहेर गेलो, कदाचित त्याची तुलना मी पुन्हा कुणाकडूनच करू शकत नाही. तुम्ही समजू शकता की, माझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे? म्हणजेच यापेक्षा महत्त्वाचे काहीच नसते. त्यामुळेच मी स्वत:ला रोखले. कारण, आता माझ्याकडे मिळवण्यासाठी उरलेच काय आहे, ज्याने मी उत्साहित आहे, खूप उत्साहित.”
कूकची कारकीर्द
ऍलिस्टर याची गणना जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये होते. त्याने इंग्लंडकडून 161 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 291 डावांमध्ये त्याने 45.35च्या सरासरीने 12472 धावा केल्या आहेत. यामध्ये 33 शतकांचाही समावेश आहे. तसेच, त्याने 92 वनडे सामने आणि 4 आंतरराष्ट्रीय टी20 सामनेही खेळले आहेत. वनडेत त्याने 5 शतकांच्या मदतीने 36.40च्या सरासरीने 3204 धावा केल्या आहेत. तसेच, टी20त त्याला फक्त 61 धावा करता आल्या आहेत. (former captain alastair cook reveals about his dream of making a comeback to cricket)
महत्त्वाच्या बातम्या-
मालिका खिशात घालण्यासाठी ब्रायन लारा स्टेडिअमवर उतरणार भारत अन् वेस्ट इंडिज; कोण कुणावर भारी? वाचाच
कोणावर अन्याय तर कोणाला संधी! अशी आहे आयर्लंडविरुद्ध खेळणारी यंग इंडिया