सध्या भारतीय क्रिकेटविश्वात चर्चिलं जाणारं मराठी नाव म्हणजे ऋतुराज गायकवाड. ऋतुराजने त्याच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी त्याला भारताचा कर्णधार, तर आयर्लंड दौऱ्यावर उपकर्णधारही बनवले आहे. सगळीकडे ऋतुराजची चर्चा सुरू आहे. अशात भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज किरण मोरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ऋतुराजविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्यानुसार, ऋतुराज असा खेळाडू आहे, जो सर्व क्रिकेट प्रकारात खेळू शकतो. तसेच, भविष्यात भारतीय संघाचा कर्णधारही बनू शकतो.
‘ऋतुराजला एमएस धोनीकडून भरपूर शिकायला मिळाले’
किरण मोरे (Kiran More) यांच्या मते, ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्याकडे तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळण्याची क्षमता आहे. जिओ सिनेमावर बोलताना ते म्हणाले की, “मी ऋतुराज गायकवाडच्या कसोटी पदार्पणाची वाट पाहत आहे. गायकवाड आणि यशस्वी जयसवाल दोघेही शानदार खेळाडू आहेत. ऋतुराज तर प्रत्येक क्रिकेट प्रकारात खेळू शकतो. कारण, त्याचे बेसिक खूपच चांगले आहे. तो भविष्यात भारताचा कर्णधारही बनू शकतो. त्याचा स्वभाव शानदार आहे. तो आयपीएलमध्ये एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. त्यामुळे त्याला भरपूर काही शिकायला मिळाले असेल. जसे की, संघाला कशाप्रकारे हाताळले जाते आणि परिस्थिती कशाप्रकारे हाताळले जाऊ शकते. तो एक गुणवान खेळाडू आहे आणि मला त्याच्या कसोटी पदार्पणाची प्रतीक्षा आहे.”
ऋतुराजच्या खांद्यावर भारताच्या नेतृत्वाची धुरा
खरं तर, ऋतुराज आयपीएलमध्ये चांगलाच चमकला होता. तसेच, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला भारतीय संघात सातत्याने संधी दिली जात आहे. ऋतुराज गायकवाड याला आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 (Asian Games 2023) यासाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नेमले आहे. भारतीय क्रिकेट संघ पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे.
बीसीसीआयने आगामी विश्वचषक लक्षात घेता आयपीएल 2023 आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत शानदार प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्याची संधी दिली आहे. या संघात राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांसारख्या आयपीएल स्टार्सचाही समावेश आहे. (former cricketer kiran more hails ruturaj gaikwad as all format player and leader)
महत्त्वाच्या बातम्या-
देशांतर्गत क्रिकेटच्या हंगामातील पहिल्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, MPL गाजवणारा पठ्ठ्या कर्णधार
आणखी किती खेळणार उस्मान ख्वाजा? पठ्ठ्याने स्पष्टच सांगितलं; म्हणाला, ‘जोपर्यंत…’