येत्या काही दिवसांतच साउथम्प्टनच्या मैदानावर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. संपूर्ण क्रिकेटविश्व या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. हा सामना भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये १८ जून ते २२ जून दरम्यान पार पडणार आहे. हा सामना इंग्लंडच्या मैदानावर होणार असून इंग्लंडमध्ये धावा करणे ही सोपी गोष्ट नाही. परंतु दोन्ही संघात असे काही फलंदाज आहेत, जे या मोठ्या सामन्यात मोठी खेळी करू शकतात. अशातच दिग्गज क्रिकेटपटूंनी काही फलंदाजांची नावे सुचवली आहेत, जे या सामन्यात मोठी खेळी करू शकतात.
स्टारस्पोर्ट्स वर प्रसारित होणारा शो क्रिकेट कनेक्टेडमध्ये बोलताना अजित आगरकर, इरफान पठाण, पार्थिव पटेल आणि स्कॉट स्टायरीस यांनी आपल्या आवडत्या फलंदाजांची नावे सांगितली आहेत. जे आगामी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धावांचा डोंगर उभारू शकतात.
आपले मत मांडताना अजित आगरकर म्हणाले की, “मी विराट कोहलीची निवड करेल. यामागचे कारण असे की, इंग्लंडच्या कठीण परिस्थितीत त्याने अनेकदा सिद्ध केले आहे की, तो काय करू शकतो. माझी अशी इच्छा आहे की, कोहलीने भरपूर धावा कराव्या.”
तसेच पार्थिव पटेलने म्हटले की, “चेतेश्वर पुजारा हा सर्वाधिक धावा करेल आणि जर भारतीय संघाने हा सामना जिंकला तर पुजारा सामनावीर पुरस्काराचा मानकरी देखील ठरेल. भारतीय संघाने जर लवकर गडी गमावले तर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला येऊन पुजाराने ३-४ तास फलंदाजी केली; तर भारतीय संघ मजबूत स्थितीत येऊ शकतो.”
तसेच इरफान पठाणचे म्हणणे आहे की, “केन विलियमसन या सामन्यात सर्वाधिक धावा करेल.” तसेच न्यूझीलंड संघाचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरीसने म्हटले की, “न्यूझीलंड संघाकडून केन विलियमसन किंवा डेवोन कॉनवे यांपैकी एक फलंदाज सर्वाधिक धावा करेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
केवळ १२ सामने खेळलेल्या पाक गोलंदाजाची ‘भलीमोठी इच्छा’; एबी, कोहली, बटलर अन् मॉर्गनची घ्यायचीय विकेट
इंग्लंडचा सैरसपाटा वा अजून काही! कसोटी चॅम्पियनशीप फायनलनंतर विराटसेनेला मिळणार ‘मोठी’ सूट
आयपीएलची पहिलीवहिली सुपर ओव्हर टाकणारा गोलंदाज आता करतो तरी काय? घ्या जाणून