भारत आणि बांगलादेश यांच्यामध्यै आगामी 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही कसोटी मालिका चेन्नईच्या मैदानावर रंगणार आहे. बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील झाली आहे. भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) 18 महिन्यानंतर भारतीय कसोटी संघात परतला आहे. तत्पूर्वी कोहलीच्या कामगिरीबद्दल पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने मोठी भविष्यवाणी केली आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीने (Basit Ali) कोहलीच्या कामगिरीबद्दल मौन सोडले आहे. बासित अली (Basit Ali) म्हणाला, “बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहलीच्या बॅटमधून मोठी शतकी खेळी पाहायला मिळेल. 110 किंवा 115 नाही तर त्याच्या बॅटमधून 200 धावांची खेळी पाहायला मिळेल.”
कोहलीच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 113 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 49.15च्या सरासरीने फलंदाजी करताना 8,848 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याने 30 अर्धशतकांसह 29 शतके झळकावली आहेत, तर 7 द्विशतकेही झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 राहिली आहे.
बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल
महत्त्वाच्या बातम्या-
रिंकू सिंग.. रिंकू सिंग.. लहान मुलंही यश दयालला चिडवायची; वडिलांनी मांडली व्यथा
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या टी20 साठी पदार्पण करणार 3 नवे चेहरे, इंग्लंडची आगळी-वेगळीच प्लेइंग 11
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनकडे नंबर 1 गोलंदाज बनण्याची संधी, घ्याव्या लागतील फक्त ‘इतक्या’ विकेट्स