ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासात आजपर्यंत अनेक दिग्गज कर्णधार झाले आहेत. यात रिकी पाँटिंगचाही समावेश आहे. पाँटिंगने कर्णधार म्हणून मोठे यश मिळवले आहे. त्याने कर्णधार म्हणून सलग 2 विश्वचषकही जिंकले आहेत. पण आता त्याच्याबद्दल एक मोठा खुलासा माजी कर्णधार मायकल क्लार्कने केला आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने म्हणाला की त्याने आपल्या कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात माजी कर्णधार रिकी पाँटिंगला संघात खेळवण्यासाठी निवड समितीला आग्रह केला होता.
मायकल क्लार्क म्हणाला की, “जेव्हा मी कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा मी रिकी पाँटिंगला संघात ठेवण्यासाठी संघर्ष केला. निवड समितीने मला सांगितले की असे क्वचितच होते की कर्णधार पदावरून काढून टाकलेला खेळाडू संघात कायम खेळतो. जर तुला काही वेगळे वाटत असेल तर रिकीची जाण्याची वेळ आली आहे. ”
मायकेल क्लार्क म्हणाला, “मी निवड समितीला सांगितले होते की मला रिकी पाँटिंगची गरज आहे. फलंदाज म्हणून आम्हाला ते हवे आहेत. ते एक चांगले प्रशिक्षकही होऊ शकतात. मी त्यांना संघात ठेवण्यासाठी संघर्ष केला. रिकी पाँटिंग यांनी युवा खेळाडूंना आवश्यक ती मदत केली होती. जर ते त्यांच्या क्षमतेच्या 80 टक्के जरी देऊ शकले, तरी ते 3 किंवा 4 क्रमांकावर खेळणार्या इतर क्रिकेटपटूंपेक्षा चांगले आहेत.”
मायकेल क्लार्क म्हणाला की, “मी ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. कर्णधार होण्याचे स्वप्न कधी पाहिले नव्हते. जेव्हा मी उपकर्णधार होतो तेव्हा मला कर्णधार होणे खूप कठीण वाटत होते. मला पुढील कर्णधार म्हणून नेमण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तो काळ विशेष होता.”
हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, रिकी पाँटिंग हे ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधार म्हणून गणले जातात. त्यांच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली. विशेष म्हणजे पाँटिंग यांनी आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघाला 2003 व 2007 सालचा विश्वचषक जिंकून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
“कशाला पुढच्या जन्माची चिंता करतोस?”, कैफचा युवराजच्या ‘त्या’ कमेंटवर रिप्लाय
ऑक्सीजन सिलेंडर लावून स्वयंपाक बनवणाऱ्या आईची मदत करणार वीरू; सोशल मीडियावर केले ‘हे’ आवाहन