इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे (आयपीएल २०२१) बिगुल वाजले आहे. मागील महिन्यांत बीसीसीआयने या हंगामाचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून भारतातच सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नई येथे गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेगंलोर संघात होणार आहे. तर अंतिम सामना ३० मे रोजी अमहादाबादच्या स्टेडियमवर खेळवण्यात येईल.
आयपीएलमध्ये आत्तापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संघामध्ये चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स बरोबरच सनरायझर्स हैदराबादचेही नाव घेतले जाते. आयपीएलमध्ये हैदराबादचा संघ २०१३ पासून खेळत आहे. त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या ८ हंगामांपैकी ६ वेळा पहिल्या ६ संघांमध्ये स्थान मिळवले आहे. तसेच २०१६ ला त्यांनी विजेतेपदही जिंकले आहे. तर २०१८ ला हैदराबाद संघ उपविजेता ठरला होता. आता यावर्षी त्यांचा आयपीएलचे दुसरे विजेतेपद जिंकण्याचा इरादा असेल.
‘ऑरेंज आर्मी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबाद संघाने यावर्षीच्या आयपीएलसाठी त्यांच्या संघात फारसे बदल केलेले नाहीत. परंतु अफगानिस्तानचा युवा फिरकीपटू मुजीब झारदान याला त्यांनी १.५० कोटींच्या किंमतीला विकत घेतले आहे. याचबरोबर त्यांच्याकडे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक असणारा राशिद खानही उपलब्ध आहे.
त्याचबरोबर त्यांच्या संघात कर्णधार डेविड वॉर्नर, केन विलियम्सन, भुवनेश्वर कुमार, मनिष पांडे, जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय असे स्टार खेळाडूही आहेत. त्यामुळे त्यांचे जेतेपद जिंकण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
यावर्षी हैदराबादचा पहिला सामना ११ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध चेन्नईत होणार आहे. या हंगामात हैदराबादच्या साखळी फेरीतील १४ सामन्यांपैकी ११ सामने रात्री ७.३० वाजता सुरु होतील. तर ३ सामने दुपारी ३.३० वाजता सुरु होतील.
🚨 Attention #OrangeArmy 🚨
Here’s a post you must save!!
Our fixtures for #IPL2021 are out! pic.twitter.com/WsQmLL7Qdy
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 7, 2021
असे आहे आयपीएल 2020मधील सनरायझर्स हैद्राबाद संघाच्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक –
११ एप्रिल – चेन्नई, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१४ एप्रिल – चेन्नई, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
१७ एप्रिल – चेन्नई, मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ एप्रिल – चेन्नई, पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वाजता
२५ एप्रिल – चेन्नई, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२८ एप्रिल – दिल्ली, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
२ मे – दिल्ली, राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३०
४ मे – दिल्ली, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
७ मे – दिल्ली, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
९ मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
१३ मे – कोलकाता, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१७ मे – कोलकाता, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
१९ मे – बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ मे – बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वाजता
सनरायझर्स हैदराबाद – २५ खेळाडू (८ परदेशी)
डेविड वॉर्नर, केन विलियम्सन, मनिष पांडे, वृद्धिमान साहा, अभिषेक शर्मा, बेसिल थँपी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो, मोहम्मद नबी, रशीद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी नटराजन, विजय शंकर ,अब्दुल समद, जेसन रॉय, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, विराट सिंग, केदार जाधव, मुजीब झारदान, जे सुचिथ
महत्त्वाच्या बातम्या-
‘किंग खान’च्या केकेआरची नजर तिसऱ्या विजेतेपदावर; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध होणार लढत
अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेली सीएसके पटकावणार चौथे जेतेपद? पाहा ‘थाला’च्या संघाचे पूर्ण वेळापत्रक