भारतीय संघाने रविवारी (दि. 19 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 6 गडी राखून मोठा विजय मिळवला. हा विजय मिळवताच भारतीय संघ चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडीवर पोहोचला. तसेच, बॉर्डर-गावसकर ट्रॉफी देखील भारताने आपल्याकडेच राखली. ऑस्ट्रेलियन संघापुढे आता व्हाईट वॉश टाळण्याचे मोठे आव्हान असेल. ऑस्ट्रेलियन संघ मोठ्या संकटात सापडला असताना भारताचा माजी सलामीवीर व समालोचक गौतम गंभीर याने एक सल्ला दिला आहे.
नागपूर येथील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अक्षरशा नांग्या टाकत लाजिरवाणा पराभव पत्करलेला. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. पहिल्या दोन दिवसात ऑस्ट्रेलियाने चमकदार खेळ दाखवत सामन्यावर पकड देखील मिळवलेली. मात्र, तिसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने रविंद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन यांच्यासमोर आपले नऊ बळी गमावले. त्यानंतर विजयासाठी मिळालेले 115 धावांचे लक्ष भारताने चार गडी गमावत पूर्ण करत मालिकेत आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलियन संघाबाबत बोलताना गंभीर म्हणाला,
“मालिकेच्या मध्यात तुम्ही या खेळाडूंना तंत्र बदलायला लावू शकत नाही. यांना तुम्ही बचाव शिकवू शकणार नाही. खेळाडूंनी वैयक्तिक कामगिरीकडे लक्ष दिल्यास ते मालिकेत थोडाफार संघर्ष करताना दिसतील. सांघिक कामगिरीचा विचार केल्यास पुनरागमन अशक्य आहेत.”
गंभीर पुढे बोलताना म्हणाला,
“ऑस्ट्रेलिया संघात मला काही असे खेळाडू दिसतात ज्यांना स्वतःच्याच प्रतिभेविषयी शंका वाटत आहे. तुमच्याकडे स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन व उस्मान ख्वाजा यांच्यासारखे फलंदाज आहेत. हे फलंदाज मोठा फरक पाडू शकतात.”
गंभीर याने या मालिकेत भारतीय संघ 4-0 असा विजय मिळवेल याबाबतही शंका व्यक्त केली. ऑस्ट्रेलिया संघ एखादा सामना अनिर्णित ठेवू शकतो असे त्याने म्हटले.
(Gautam Gambhir Talk About Australia Team Intent In Border-Gavaskar Trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गिल नव्हेतर ‘हा’ फलंदाज वाटतो स्मिथला ‘फ्युचर सुपरस्टार’, सध्या आहे भलत्याच फॉर्ममध्ये
BREAKING: क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर मॉडेल सपना गिलकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल, सेल्फी प्रकरण चिघळले (mahasports.in)