मुंबई। सरकारने लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर हजारो लोक खरेदीसाठी रस्त्यांवर गर्दी करताना दिसून येत आहेत. यातच प्रशासन लोकांना सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करत आहे. पण कोरोनाचे गांभीर्य लक्षात न घेत लोकांची खरेदीसाठी एकच झुंबड उडाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्याच्या अविर्भावात वावरणाऱ्या लोकांच्या या वर्तणुकीविषयी भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने नाराजी व्यक्त केली आहे. हरभजन सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पेंटिंग शेअर करत देशभरातील सर्व डॉक्टरांची माफी मागितली आहे.
शेअर करण्यात आलेल्या पेंटिंगमध्ये तोंडाला मास्क लावलेला एक डॉक्टर निराश अवस्थेमध्ये दिसून येत आहे. तसेच फोटोमध्ये बाजारात खरेदीसाठी खूप गर्दी झालेली दाखवण्यात आली आहे. हरभजनने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सध्याची परिस्थिती. आम्हाला माफ करा डॉक्टर. आता तुम्ही आराम करू शकता. आम्ही खरेदीमध्ये व्यस्त आहोत. लवकरच आपण भेटू. यासोबत हरभजन सिंगने निराशा दाखवणारे एक इमोजी देखील शेअर केली आहे.”
यासोबत हरभजन सिंगने मास्कचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटो कॅप्शनमध्ये लिहिले की, “एक जग एक झेंडा! लोकांनी तोंडाला मास्क लावून महामारी पासून आपला बचाव करावा”, असे आवाहन देखील त्याने केले.
हरभजन सिंगने लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना अन्न पुरवण्यासाठी मोहीम उभी केली आहे. ‘खाना चाहिए’या मोहिमेच्या माध्यमातून त्याने अनेक लोकांना अन्न पुरवठा केला आहे. या मोहिमेत काम करणाऱ्या लोकांचा देखील उत्साह वाढविण्याचे तो काम करत आहे. या संबंधीचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
दारुच्या नशेत असा करतात भांगडा! मनदीप सिंगचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
विराट कोहली ‘या’ गोष्टीत आहे मास्टर ब्लास्टरच्या २ पाऊले पुढे, घ्या जाणून
तेंडुलकरसमोर शतक करणाऱ्या ‘या’ खेळाडूने अवलंबला वाईट मार्ग, ज्यूसच्या बॉटलमध्ये लपवले होते ड्रग्स