भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याने मुकेश कुमारचे कौतुक केले. वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मुकेश कुमार याला भारतासाठी कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. कारकिर्दीतील पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने दोन विकेट्स घेतल्या. झहीर खान मुकेशचे पहिल्याच कसोटी सामन्यातील प्रदर्शन पाहून प्रभावित झाल्याचे दिसते.
आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात मुकेश कुमार (Zaheer Khan) याने लाईन आणि लेंथवर चांगली पकड असल्याचे दाखवून दिले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगल्या प्रदर्शनानंतर त्याला भारतासाठी पदार्पणाची ही संधी मिळाली. कसोटी कारकिर्दीची सुरुवात देखील त्याने चांगल्या पद्धतीने केली. अशात झहीर खान (Zaheer Khan) याच्या मते आगामी काहीकाळा त्याला त्याला संघात कामय ठेवले जाऊ शकते.
जिओ सिनेमावर बोलताना झहीर खान म्हणाला, “तो (मुकेश कुमार) गोलंदाजी करताना चांगला वाटत होता, यात शंकाच नाही. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याची गोलंदाज योग्य टप्प्यावर आणि चांगली होती. भारतीय संघाकडे असलेली अशा प्रकारची बेंच स्ट्रेंथ पाहून वाटते की, आपल्याकडे किती भक्कम गोलंदाजी आक्रमण आहे. तुम्हाला पाहायला मिळेल की, मुकेश कुमार पुढचा काहीकाळ भारतीय संघाच्या गोलंदाजी आक्रमाणाचा भाग असेल.”
“पण तो इथून पुढच्या गोष्टी कशा पद्धतीने हाताळतो, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. इथून पुढे तो आपल्या गोलंदाजीचा दर्जा कसा उंचावतो, हे पाहण्यासारखे असेल. मला वाटते त्याला आपल्या गोलंदाजीमध्ये थोडी अधिक गती आणावी लागेल. त्यानंतर यश मिळायला सुरूवात होईल. मोहम्मद सिराजकडून तो गोष्टी शिकू शकतो,” असेही झहीर पुढे म्हणाला.
दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्ध पदार्पण करताना मुकेश कुमार दोन पेक्षा जास्त विकेट्स घेऊ शकत होता. पण पावसामुळे शेवटच्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही. दुसऱ्या डावात वेस्ट इंडीजने 2 बाद 76 धावा केल्या होत्या आणि भारतीय संघ 289 धावांनी पुढे होता. शेवटच्या दिवसाचा खेळ रद्द झाल्याने सामना निकाली न निघता अनिर्णित राहिला. मालिका भारताने 0-1 अशा अंतराने जिंकली. (‘He will stay in the bowling attack for a while’, Zaheer Khan impressed with Mukesh Kumar)
महत्वाच्या बातम्या –
लवकरच जन्माला येणार बेबी मॅक्सवेल! भारतीय संस्कृतीनुसार पार पडले विनी रमनचे डोहाळे जेवण
थेट पाच महिन्यांनी भारतीय संघ दिसणार व्हाईट जर्सीत! जाणून घ्या शेड्यूल