सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा हे मैदानावर किंवा मैदानाबाहेर चांगले मित्र आहेत. दोघे बऱ्याच वर्षांपासून एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) भाग राहिले आहेत आणि त्यांची मैदानावरील चांगली केमिस्ट्रीही बऱ्याचदा पाहायला मिळते. परंतु या मित्रांमध्ये एकदा या दोन खेळाडूंमध्ये आपापसातच मैदानावर वाद झाला होता.
2013 मध्ये कॅरेबियन बेटमध्ये भारताच्या सेल्कॉन चषक तिरंगी मालिकेत हा किस्सा घडला होता. या तिरंगी मालिकेत भारताखेरीज श्रीलंका आणि यजमान वेस्ट इंडिजचा समावेश होता. धोनी आणि कंपनीच्या नाबाद आणि अविस्मरणीय 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेनंतर हा सामना खेळला गेला होता. कर्णधार धोनीला या मालिकेमध्ये विश्रांती देण्यात आली होती. कारण त्याला हेमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रास होत होता.
धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीला प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. या मालिकेचा चौथा सामना भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरू होता. या सामन्यात भारतीय संघाची परिस्थिती फारशी विशेष नव्हती. पण सामन्यात तणाव तेव्हा निर्माण झाला; जेव्हा भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या चेंडूवर भारताचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुरेश रैनाने झेल सोडला होता.
विंडीज संघ धावांचा पाठलाग करताना रैनाने अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीचा झेल सोडला आणि यामुळे जडेजाला राग आला होता. त्यानंतर यावरुन रैना आणि जडेजा यांच्यात जोरदार वाद देखील झाला.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, विंडीजने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने शतक आणि शिखर धवनने 69 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताने 7 गडी बाद 311 धावा केल्या होत्या. दुसरीकडे वेस्ट इंडीज संघाचे 171 धावांमध्ये सर्व गडी बाद झाले होते. तर भारतीय संघाने 102 धावांनी वेस्ट इंडिजला पराभूत केले होते. त्यानंतर श्रीलंकेला सलग दोनदा पराभूत करून भारताने तिरंगी मालिका जिंकली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
ग्रेट भेट! लग्नाच्या वाढदिवशी धोनी फॅमिलीच्या घरी ‘नव्या पाहुणी’चे आगमन, तुम्हीही घ्या पाहून
‘आमच्या अनुभवापुढे तुमचा टिकाव तरी लागेल?’; धवनसेनेला कमी लेखणाऱ्या रणतुंगाला चोप्राचे खडेबोल
‘एक बार परदा हटा दे शराबी’ गाण्यावर थिरकली शमीची मुलगी; सहकारी म्हणाला, ‘शानदार बेबो’