भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-२० मालिका (ind vs wi t20 series) बुधवारी (१६ फेब्रुवारी) सुरू झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा २१ वर्षीय युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई (ravi bishnoi) याला टी-२० पदार्पणाची संधी मिळाली. त्याने या सामन्यात चांगली कांमगिरी केली, परंतु क्षेत्ररक्षणादरम्यान त्याच्याकडून एक मोठी चूक झाल्याचे पाहायला मिळाले.
उभय संघातील टी-२० मालिका कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात पदार्पणवीर रवी बिश्नोईने वेस्ट इंडीजच्या निकोलस पूरनचा (Nicoles Pooran) एक झेल पकडला, तरीही पूरनला जीवनदान मिळाले. भारताच्या गोलंदाजीवेळी सहाव्या षटकात हा प्रकार घडला, जेव्हा फिरकीपटू युजवेंद्र चहल (yuzvendra chahal) गोलंदाजी करत होता. चहलच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पूरनने लॉंग ऑफच्या दिशेने मोठा शॉट खेळला, जो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या रवी बिश्नोईच्या थेट हातात गेला.
बिश्नोईने हा झेल उत्कृष्टपणे पकडला. बिश्नोई त्यावेळी सीमारेषेच्या अगदी जवळ होता. झेल पकडल्यानंतर त्याला याविषयी अंदाज आला नाही. झेल पकडल्यानंतर बिश्नोईचा पाय सीमारेषेला जाऊन चिकटला, ज्यामुळे निकोलस पूरनला जीवनदान मिळाले. ही घटना घडताच पंचांनी रिव्यू पाहिला आणि आधी दिलेला निर्णय बदलून षटकार असल्याचे घोषित केले.
चहलच्या पहिल्या चेंडूवर जरी विकेट मिळाली नसली, तरी त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने मेयर्सला पायचित बाद केले. पूरनने मात्र त्याला मिळालेल्या जीवनदानाचा चांगलाच फायदा घेतला. वेस्ट इंडीजसाठी पूरनने सर्वाधिक ६१ केल्या.
— Bleh (@rishabh2209420) February 16, 2022
चहलच्या षटकात रवी बिश्नोईने महत्वाचा झेल सोडला असला, तरी चहल मात्र बिश्नोईला प्रोस्ताहन देताना दिसला. चहलने या सामन्यात एक विकेट घेतली. तर रवी बिश्नोईने चार षटकात १७ धावा खर्च करत २ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. बिश्नोईने सामन्याच्या ११ व्या षटकातील दुसऱ्या आणि ५ व्या चेंडूवर या विकेट्स घेतल्या. पदार्पणाच्या सामन्यात बिश्नोईने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महत्वाच्या बातम्या –
जयपूर पिंक पँथर्सची विजयी घोडदौड सुरूच, तेलुगू टायटन्सला ५४-३५ ने केले चितपट
इशांत शर्माचा ‘यू टर्न’! आयपीएलमध्ये नाही मिळाला खरेदीदार, आता ‘या’ रणजी संघाचे करणार प्रतिनिधित्त्व
मेगा लिलावानंतर गंभीरने ‘त्या’ खेळाडूला म्हटले ‘फायदेशीर डील’