पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने (Indian Hockey Team) चौथे पदक जिंकले आहे. गुरुवारी (08 ऑगस्ट) भारतीय हॉकी संघाची ब्राँझपदकासाठी स्पेनशी लढत झाली, ज्यामध्ये संघाने 2-1 असा शानदार विजय नोंदवला. भारतासाठी हे पदक खास ठरले. पण भारताने हे पदक एका खास व्यक्तीला समर्पित केले. भारताचा माजी हॉकी कर्मधार मनप्रीत सिंगने सामना संपल्यावर ही गोष्ट सर्वांना सांगितली.
उपांत्य फेरीत जर्मनी विरुद्ध पराभूत झाल्यामुळे भारतीय संघाला हा सामना खेळावा लागला होता. स्पेन संघाने पहिला गोल नोंदवत आघाडी घेतली होती. मात्र, यानंतर भारतीय संघासाठी कर्णधार हरमनप्रीत याने दोन गोल नोंदवले. हेच गोल निर्णायक ठरले. यासह भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ऑलिंपिक्समध्ये पदक जिंकले.
भारतीय हॉकी संघाचे हे एकूण तेरावे ऑलिंपिक्स पदक आहे. भारताने आतापर्यंत आठ सुवर्णपदके, चार कांस्य पदके व एक रौप्य पदक जिंकले आहे. मागील वेळी झालेल्या टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताने तब्बल 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपुष्टात आणला होता.
भारतीय संघाने विजय मिळवल्यावर मनप्रीत सिंगने हे कांस्यपदक श्रीजेशला समर्पित केल्याचे सांगितले. कारण श्रीजेशचा हा अखेरचा सामना होता. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) म्हणाला की, “भारताच्या हॉकी संघात काही खेळाडूंचे जे वय आहे, त्यापेक्षा जास्त वर्षे श्रीजेश हा भारतासाठी हॉकी खेळला आहे. त्यामुळे त्याचे भारतीय हॉकीमधील योगदान हे सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे आमच्या सर्वांसाठी हा फारच भावूक क्षण आहे. कारण आमच्या संघातील एक सर्वात महत्वाचा व्यक्ती यापुढे आमच्यबरोबर मैदानात नसेल. पण श्रीजेशने भारतीय हॉकीसाठी जे काही केले आहे, त्यालाच तोडच नाही.”