झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारताने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा विश्रांतीमुळे या दौऱ्यावर जाणार नसल्याने शिखर धवनकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत आणि मोहम्मद शमी यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफला भीती वाटते की, भारत १९९० च्या दशकातील पाकिस्तानच्या चुकांची पुनरावृत्ती करत आहे.
गेल्या काही महिन्यांत झालेल्या कर्णधारांच्या फेरबदलावर लतीफ म्हणाले की, “पाकिस्तानने १९९०च्या दशकातही असेच केले होते आणि त्यामुळे त्यांच्या संघाचे नुकसान झाले आहे. ते म्हणाले की, भारत खेळाच्या इतर मुद्द्यांपेक्षा नेतृत्वावर अधिक भर देत आहे.”
२००३मध्ये ६ कसोटी आणि २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व करणारा रशीद लतीफ म्हणाले की, “प्रत्येकजण बॅकअपबद्दल बोलतो. पण त्यांनी आता गेल्या वर्षभरात सात बॅकअप कॅप्टन बनवले आहेत! भारताच्या इतिहासात मी हे प्रथमच पाहत आहे. विराट कोहली, केएल राहुल, रोहित शर्मा, शिखर धवन, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह इतक्या जणांना बारताचे नेतृत्व गेल्लया काळात देण्यात आलले, त्यामुळे पाकिस्तानने १९९०च्या दशकात जी चूक केली होती तीच ते पुन्हा करत आहे.”
तो पुढे म्हणाले की, “त्यांना एकही मजबूत सलामीवीर सापडला नाही किंवा त्यांच्याकडे स्थिर मध्यक्रम नाही. त्यांना फक्त एका नव्या कर्णधाराची गरज आहे. कोणताही कर्णधार त्यांच्याकडून सातत्याने खेळत नाही. केएल राहुल आता अनफिट आहे, रोहित आधी अनफिट होता. विराट मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. त्यामुळे त्यांनी याचा विचार करावा.भारताला सध्या सौरव गांगुली, एमएस धोनी, विराट कोहली सारखे नेतृत्व हवे आहे.”
दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे संघाचे नेतृत्व करणाऱ्या शिखर धवनला पुन्हा एकदा भारताचे कर्णधारपद भुषवण्याची संधी मिळाली आहे. धवनच्या नेतृत्वात आणि दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताने वेस्ट इंडिजलला वनडे मालिलकेत ३-० असा क्लिन स्विप दिला. त्यामुळे भारतीय संघाला नेतृत्व बदललाचा अद्याप कोणताही तोटा सहन करावा ललागलेला नाही. मात्र, येत्या काळलात आशिया कप, टी२० विश्वचषक आणि वनडे विश्वचषक अशा तीन मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे आहे. त्यासाठी आत्तापासूनच संघात स्थिरता निर्माण करणे गरजेचे असल्याचे अनेक दिग्गजांचे मत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मॅचही गेली आणि पैसेही! पहिल्या टी२०तील पराभवानंतर आयसीसीकडून वेस्ट इंडिजवर कारवाई
मुलाच्या जन्मानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने केले लग्न, लव्हस्टोरी आहे खूपच जबरदस्त
‘मी माझ्या मनाचं ऐकलं अन् जे झालं ते…’, अर्शदीप सिंगने सांगितलं पडद्यामागील रहस्य