सिडनी | भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि कसोटी संघात मोठी संधी मिळालेला रोहित शर्मा सिडनी कसोटीपुर्वीच भारतात परतणार आहे. रोहित शर्माला कालच कन्यारत्न प्राप्त झाले आहे.
भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत विजय मिळवत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. याच कसोटी रोहितने ६३ धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयात मोठा हातभार लावला होता.
सिडनी कसोटीत भारतीय संघ विजय मिळवून मालिका ३-१ अशी जिंकण्यासाठी उत्सुक आहे. यामुळे रोहितच्या जागी आता संघव्यवस्थापन कुणाला संधी देते हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.
रोहित शर्माच्या जागी खरेतर मधल्या फळीतील फलंदाजालाच संधी द्यायला हवी. परंतु १९ सदस्यीय खेळाडूंमध्ये एकही खेळाडू असा नाही जो मधल्या फळीतील स्पेशलिस्ट खेळाडू आहे.
यामुळे हनुमा विहारीकडेच हा पर्याय म्हणून पाहिले जात आहे तर केएल राहुल किंवा मुरली विजय यांपैकी एकाला सलामीचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
दुसरा पर्यायही काहीसा असाच असून पार्थिव पटेलला सलामीला पाठवून हनुमा विहारीला रोहितच्या जागी खेळवणे.
अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्याला मेलबर्न कसोटीत सराव नसल्यामुळे संधी देण्यात आली नव्हती. यामध्ये अजूनही कोणताही बदल न झाल्यामुळे संघव्यवस्थापन त्याचा कसा विचार करते हे पहाणे मनोरंजक ठरणार आहे. जर हार्दिकला संधी दिली तर
भारताकडे जडेजा सोडून आर अश्विन आणि कुलदीप यादव हे स्पेशलिस्ट फिरकीपटू आहेत. अश्विनला दुखापतीमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत खेळता आले नाही. परंतु त्याला आता फिट घोषीत करण्यात आले आहे. तसेच सिडनी टेस्ट ही फिरकीला चांगली साथ देईल असे बोलले जात आहे. तसेच अश्विन रोहितची कमी बऱ्यापैकी भरूनही काढू शकतो. कुलदीपला या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
यापैकी एकाची होणार रोहित शर्माच्या जागी निवड-
सलामीवीर- मुरली विजय, केएल राहुल, पार्थिव पटेल
अष्टपैलू- हार्दिक पंड्या
फिरकीपटू- आर अश्विन, कुलदीप यादव
वेगवान गोलंदाज- भुवनेश्वर कुमार, उमेश यादव
महत्त्वाच्या बातम्या:
–कमी सामन्यात कर्णधार राहुन कोहली विक्रमांत धोनी- गांगुलीच्या पुढे
–बुमराह पॅटर्न लईच वाईट, आफ्रिका, इंग्लड आणि आता ऑस्ट्रेलिया, कुणालाच समजला नाही
–बुमराह एक, पराक्रम अनेक- भारताच्या या शिलेदाराचे भीमपराक्रम पहाच