भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार फलंदाज स्टीव स्मिथ पूर्णपणे अपयशी ठरला होता. त्यानंतर गुरुवार पासून खेळल्या जात असलेल्या तिसर्या कसोटीच्या पहिल्या दिवशी स्टीव्ह स्मिथला सूर गवसला आहे. त्याने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद 31 धावांची खेळी केली आहे. खेळ संपल्यानंतर स्मिथने आपल्या खेळी बद्दल सांगितले.
ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या डावात ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार फलंदाज चांगली फलंदाजी करताना दिसून येत आहे. स्टीव्ह स्मिथ मागील दोन कसोटी सामन्यात सपशेल अपयशी ठरला होता. या दोन कसोटी सामन्यातील चार डावात त्याला एकदाही दुहेरी धावसंख्या पार करता आली नव्हती. मात्र तिसर्या सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याच्या फलंदाजीमध्ये चमक दिसून येत आहे.
पहिल्या दिवशी स्मिथने 35 व्या षटकात फलंदाजी करताना अश्विनच्या गोलंदाजीचा दबाव आपल्यावर येवू न देता अश्विनवर दबावर टाकण्याच्या प्रयत्न केला. त्याने क्रिज मधून बाहेर निघत अश्विनच्या फिरकीचा सामना केला. त्यामुळे पहिल्या दिवस अखेर स्टीव्ह स्मिथने 31 धावा केल्या आणि नाबाद तंबूत परतला. पहिल्या दिवशी स्टीव्ह स्मिथने जवळपास 20 षटके फलंदाजी केली.
स्टीव्ह स्मिथ आभासी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला, “मी आक्रमक म्हणणार नाही, मी फक्त थोडा सकारात्मक होतो. माझा त्याच्यावर(अश्विन) थोडा दबाव टाकायचा प्रयत्न होता. जो मी आतापर्यंत मालिकेत केला नव्हता. मी काही गोष्टीवर काम करत होतो. बॅटला ताकदीने पकडण्याचा प्रयत्न करत होतो. मला वाटले की, मी चांगल्या स्थितीत आहे. काही चौकार लावायचे होते.” स्टीव्ह स्मिथने त्याच्या 31 धावांच्या खेळीत 5 चौकार लगावले.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दिवशी 2 बाद 166 धावा
ऑस्ट्रेलिया संघाकडून प्रथम फलंदाजी करताना डेविड वॉर्नर 8 चेंडूचा सामना करताना 5 धावा केल्या. त्याचबरोबर विल पुकोवस्कीने 110 चेंडूचा सामना करताना 4 चौकाच्या मदतीने 62 धावांची खेळी केली. त्यानंतर मार्नस लॅब्यूशानेने 149 चेंडूचा सामना 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 67 धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथने 64 चेंडूचा सामना करताना 5 चौकार लगावत 31 धावांची नाबाद खेळी केली. भारतीय संघाकडून मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
ज्या नवदीप सैनीने सिडनीत कसोटी पदार्पण केले, त्याच्यासाठी एकवेळ भांडला होता गंभीर
… म्हणून ट्रॅविस हेडला संघात स्थान नाही, कर्णधार टीम पेनची स्पष्टोक्ती
“विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे अतिशय अवघड”