कोलकाता। वेस्ट इंडिज संघ फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातील मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील वनडे मालिका पूर्ण झाली असून आता भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात बुधवारपासून ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांची जोरदार तयारी सुरू आहे.
वनडे मालिकेत भारतीय संघाचे वेस्ट इंडिजवर पुर्णपणे वर्चस्व पाहायला मिळाले होते. भारताने अहमदाबाद येथे झालेली वनडे मालिका ३-० अशी सहज जिंकली होती. त्याचमुळे टी२० मालिकेतही हीच विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असणार आहे, तर टी२० क्रिकेटमधील बलाढ्य संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजचा मालिका जिंकून दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल.
रोहित शर्मा कर्णधार, तर रिषभ पंत उपकर्णधार
या टी२० मालिकेत भारताचे कर्णधारपद रोहित शर्मा सांभाळणार आहे. तसेच भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचा नियमित उपकर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे या मालिकेत अनुपस्थितीत राहाणार आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिकेत रिषभ पंत उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल.
भारताचे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त
भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचा नियमित उपकर्णधार केएल राहुल, फिरकीपटू अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे तिन्ही खेळाडू दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेला मुकणार आहेत. त्यामुळे बीसीसीआयने या तिघांच्या जागेवर बदली खेळाडूंची निवड केली आहे. ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा आणि कुलदीप यादव यांची टी२० मालिकेसाठी बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
त्यामुळे आता या टी२० मालिकेतील सामन्यांमध्ये कोणकोणत्या खेळाडूंना अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळणार हे पाहावे लागणार आहे.
आमने-सामने इतिहास
भारत आणि वेस्ट इंडिज संघात आत्तापर्यंत १७ टी२० सामने खेळवण्यात आले आहेत. यातील १० सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर ६ सामने वेस्ट इंडिजने जिंकले आहेत. तसेच १ सामन्याच्या निकाल लागलेला नव्हता.
त्याचबरोबर गेल्या ५ वर्षात भारतीय संघाने एकदाही टी२० मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव स्विकारलेला नाही. २०१७ साली वेस्ट इंडिजने अखेरचे भारताला टी२० मालिकेत पराभूत केले होते. त्यानंतर मात्र, वेस्ट इंडिजला भारताविरुद्ध खेळलेल्या तीन द्विपक्षीय टी२० मालिकेत विजय मिळवता आलेला नाही.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या टी२० सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी२० सामना केव्हा होणार?
– भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी२० सामना १६ फेब्रुवारी २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी२० सामना कुठे खेळवला जाणार?
– भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी२० सामना ईडन गार्डन, कोलकाता येथे खेळवला जाईल.
३. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी२० सामना किती वाजता सुरु होणार?
– भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक होईल.
४. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी२० सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा.
वेस्ट इंडिज – कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलन, डॅरेन ब्राव्हो, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ब्रँडन किंग, रोवमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, काइल मेयर्स, हेडन वॉल्श.
महत्त्वाच्या बातम्या –
डोमेस्टिक क्रिकेटचा ‘बादशहा’ वसीम जाफरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
क्रिकेटजगताला सुन्न करणारी ‘ती’ घटना, जेव्हा फलंदाजी करताना अचानक झाला होता क्रिकेटरचा मृत्यू