कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात सध्या टी२० मालिका (T20I Series) सुरू असून या मालिकेतील दुसरा सामना (2nd T20I) शुक्रवारी होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत १-० अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे शुक्रवारी होणारा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.
भारताला विजयी आघाडीची संधी
या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकला असल्याने शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून भारताला मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. तर, वेस्ट इंडिज संघ मालिकेत आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
चाहर, अय्यर दुखापतग्रस्त
पहिल्या टी२० सामन्यात खेळताना दीपक चाहर आणि वेंकटेश अय्यर यांना दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना दुसऱ्या टी२० सामन्यासाठी संधी दिली जाणार का हे पाहावे लागणार आहे. तसेच, रोहित शर्माबरोबर सलामीला इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार हे देखील पाहावे लागणार आहे. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात बाहेर बसलेल्या श्रेयस अय्यरला दुसऱ्या टी२० मध्ये संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
आमने-सामने इतिहास
भारत आणि वेस्ट इंडिज संघात आत्तापर्यंत १८ टी२० सामने खेळवण्यात आले आहेत. यातील ११ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर ६ सामने वेस्ट इंडिजने जिंकले आहेत. तसेच १ सामन्याच्या निकाल लागलेला नव्हता.
त्याचबरोबर गेल्या ५ वर्षात भारतीय संघाने एकदाही टी२० मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव स्विकारलेला नाही. २०१७ साली वेस्ट इंडिजने अखेरचे भारताला टी२० मालिकेत पराभूत केले होते. त्यानंतर मात्र, वेस्ट इंडिजला भारताविरुद्ध खेळलेल्या तीन द्विपक्षीय टी२० मालिकेत विजय मिळवता आलेला नाही.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या टी२० सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी२० सामना केव्हा होणार?
– भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी२० सामना १८ फेब्रुवारी २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी२० सामना कुठे खेळवला जाणार?
– भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी२० सामना ईडन गार्डन, कोलकाता येथे खेळवला जाईल.
३. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी२० सामना किती वाजता सुरु होणार?
– भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक होईल.
४. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा.
वेस्ट इंडिज – कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलन, डॅरेन ब्राव्हो, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ब्रँडन किंग, रोवमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, काइल मेयर्स, हेडन वॉल्श.
महत्त्वाच्या बातम्या –
नाट्यमय सामन्यात जमशेदपूरचा विजय; गतविजेत्या मुंबई सिटीची पुढील वाटचाल बिकट!
फिंच म्हणतोय, “मला माहित होते माझ्यावर बोली लागणार नाही”
ऋतुराजच्या जागी स्थान मिळालेल्या पवनने साधली संधी! ठोकले पदार्पणात नाबाद दिडशतक