---Advertisement---

इंग्लंडमुळे होणार टीम इंडियाचा स्वप्नभंग? टेस्ट चॅम्पियशीपमध्ये सर्वात यशस्वी संघ बनण्याची सुवर्णसंधी

---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेचा तिसरा सामना भारताने दुसऱ्याच दिवशी १० विकेट्सने जिंकला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) झालेल्या या सामन्यात विजय मिळवत भारताने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयाबरोबरच इंग्लंडचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहेत. असे असले तरीही अजूनही भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे आव्हान कायम आहे.

अशात ४ मार्चपासून सुरू होणारा चौथा आणि शेवटचा कसोटी सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचा आसणार आहे. या सामन्यानंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोणते दोन संघ खेळणार हे निश्चित होणार आहे. न्यूझीलंड संघाने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आधीच प्रवेशही केला आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी केवळ १ जागा शिल्लक असल्याने चुरस वाढली आहे.

जर भारताने चौथा कसोटी सामना जिंकला किंवा अनिर्णीत राखला तर ते थेट कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारतील. परंतु जर इंग्लंडने हा सामना जिंकला तर भारताऐवजी ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात प्रवेश करेल. याबरोबरच कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ बनण्याची सुवर्णसंधीही भारताच्या हातून निघून जाईल.

विराट कोहली कर्णधार असलेल्या भारतीय संघाने आतापर्यंत ६ कसोटी मालिकेत १६ सामने खेळले आहेत. त्यातील ११ सामन्यात विजय तर ४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे इंग्लंडने २० सामन्यांपैकी ११ सामने जिंकले तर ६ सामने गमावले आहेत. न्यूझीलंड संघ भलेही अंतिम फेरीत पोहोचला असला तरी त्यांनी अवघे ७ सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने ८ सामन्यात विजय मिळवला आहे.

https://twitter.com/ICC/status/1364945208941625344?s=20

त्यामुळे जर भारताने हा सामना जिंकला तर ते कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या यादीत अव्वलस्थानी कायम राहतील. परंतु जर इंग्लंडने हा सामना जिंकला तर त्यांच्या नावे सर्वाधिक १२ विजय जमा होतील.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---