येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड या बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. ही भारतीय संघाची विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातील पहिलीच मालिका असेल. त्यामुळे भारतीय संघ चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. परंतु भारतीय संघाची इंग्लंडमधील कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याला कॅप्टनकूल म्हटले जात असले तरीही तो इंग्लंडमध्ये फ्लॉप ठरला आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी सामने गमावले आहेत. इंग्लंडमध्ये धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने ९ कसोटी सामने खेळले आहेत. यात धोनीला ७ कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर अवघ्या १ कसोटी सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. यापैकी एक सामना अनिर्णीत राहिला होता.
तर दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ६ पैकी ५ कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एका कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे या वेळेस विराटकडे आपल्या कामगिरीत सुधार करण्याची चांगली संधी आहे. परंतु इंग्लंड संघाने मायदेशात उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. (Indian captains test records in England)
राहुल द्रविड आणि कपिल देव इंग्लंडमध्ये हिट
इंग्लंडमध्ये भारतीय संघाकडून १६ खेळाडूंनी नेतृत्व केले आहे. यामध्ये दिग्गज खेळाडू कपिल देव आणि राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात भारतीय संघ एकदाही पराभूत झाला नाही. उर्वरित १४ कर्णधार कमीत कमी १ तरी कसोटी सामन्यात पराभूत झाले आहेत. राहुल द्रविडने इंग्लंडमध्ये ३ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यामधे भारतीय संघाने १ सामन्यात विजय मिळवला होता. तर २ कसोटी सामने अनिर्णीत राहिले होते. तर कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये ३ कसोटी सामने खेळले आहेत. यात भारतीय संघाला २ कसोटी सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर १ सामना अनिर्णीत राहिला होता. १० कर्णधारांना तर एकही सामन्यात विजय मिळवण्यात यश आले नाही.
इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाची कामगिरी
भारतीय संघाने इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण ६३ कसोटी सामने खेळले आहेत. यात भारतीय संघाला ३५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर अवघ्या ७ कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. २०१८ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. या मालिकेत भारतीय संघाला १-४ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. तर २००७ मध्ये राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर एकही मालिकेत भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले नाही.
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकी दिग्गजाचे कोरोनामुळे निधन, तब्बल १०७ क्रिकेटपटूंची दिली होती साथ
इंग्लंडच्या ‘या’ गोलंदाजापुढे श्रीलंका फेल, पावरप्लेत ४ निर्धाव षटके टाकत केला ‘खास विक्रम’
इंग्लंडमध्ये घोंगावलं जो रूटचं वादळ, अर्धशतक झळकावत ‘या’ विक्रमांत केली रिचर्ड्सची बरोबरी