भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या नावावर अनेक मोठ मोठे विक्रम आहेत. ‘हिटमॅन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रोहितने वनडे क्रिकेटमध्ये विक्रमी ३ द्विशतक झळकावले आहेत. तसेच आगामी इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु त्याच्या नावे एक असा विक्रम आहे, जो त्याचे संघातील स्थान देखील धोक्यात आणू शकतो. कुठला आहे तो विक्रम? चला जाणून घेऊ.
रोहितच्या नावे लज्जास्पद विक्रम
‘हिटमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितने वनडे क्रिकेटमध्ये भरपूर मोठ मोठे कारनामे केले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करण्यासाठी आल्यापासून त्याने मागे वळून पाहिले नाही. जे भल्याभल्या दिग्गज खेळाडूंना जमले नाही ते रोहितने करून दाखवलं आहे. परंतु जेव्हा आपण कसोटी क्रिकेटबद्दल बोलतो, तेव्हा तो इतका प्रभावशाली दिसून येत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये मायदेशात त्याची कामगिरी चांगली आहे. परंतु परदेशातील त्याची कामगिरी चिंता वाढवणारी आहे. त्याने परदेशात केवळ ५ अर्धशतक झळकावले आहेत. तर त्याला अजुनपर्यंत एकही शतक झळकावता आले नाही. (Indian opener Rohit Sharma never scored s century in outside India in test cricket)
इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेत रोहितची असेल ‘कसोटी’
इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. या मालिकेत जर तो साजेशी कामगिरी करण्यास अपयशी ठरला तर त्याचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली गेली होती. परंतु तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, तो या मालिकेत कशी कामगिरी करतो?
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित आहे ‘बॉस’
रोहित शर्माने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वनडे क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करायला सुरुवात केल्यापासून त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये तो एकमेव फलंदाज आहे, ज्याच्या नावे ३ द्विशतक आहेत. यासह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये देखील त्याने वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत देखील तो चांगली कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! नाणेफेकीनंतर आढळला कोरोनाचा रुग्ण, वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे रद्द
मॅच विनर खेळाडूची प्रशिक्षक द्रविडबद्दल मोठी प्रतिक्रिया; म्हणे, ‘ते भारताचे गुंडे आहेत’
टी२० सामन्याच्या शेवटच्या षटकांत मिलरने ‘इतके’ षटकार ठोकत केला विश्वविक्रम, धोनीलाही टाकले मागे