भारत विरुद्ध इंग्लंड टी२० मालिकेतील दुसरा टी२० सामना रविवारी अहमदाबाद येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर नरेंद्र मोदी स्टेडियमवर ७ विकेट्सने विजय मिळवला. या विजयाबरोबर भारताने मालिकेत २-० अशी बरोबरी केली आहे. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून ८ विकेट्सने पराभव सहन करावा लागला होता.
परंतू दुसऱ्या सामन्यात भारताकडून कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७३ तर इशान किशनने ५६ धावांची तुफानी खेळी केली. असे असूनही दुसऱ्या सामन्यानंतर भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे.
दुसऱ्या सामन्यात षटकांची गती योग्य न राखल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने भारतीय संघाला दंड ठोठावला आहे. सामना फीमधील २० टक्के रक्कम भारतीय संघाला दंड़ म्हणून ठोठावण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय संघाने निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकले होते. याचमुळे भारतीय संघाला हा दंड ठोठावण्यात आला आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार जेवढी षटक निर्धारित वेळेत कमी टाकली आहे, त्या प्रत्येक षटकासाठी २० टक्के दंड ठोठावण्यात येतो. भारतीय संघाने एक षटक कमी टाकल्यामुळे २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
या मालिकेत अजून ३ सामने बाकी असून मालिका विजयासाठी भारत व इंग्लंड संघाला कमीतकमी २ सामने जिंकावे लागणार आहेत. राहिलेले सर्व सामने नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथेच होणार असून तिसरा सामना १६ मार्च, चौथा सामना १८ मार्च व शेवटचा सामना २० मार्च रोजी होणार आहे. या मालिकेकडे आयसीसी टी२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
पदार्पणाच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावणारे हे आहेत भारतीय क्रिकेटपटू
आज हिरो ठरलेल्या ईशानला काही वर्षांपूर्वी लोकांनी केली होती मारहाण, दिली गेलेली पोलीस तक्रार
आयपीएल २०२२ मध्ये ईशान आणि सूर्यकुमार नसणार मुंबईचा भाग? हे आहे कारण