क्रिकेटमध्ये खेळाडू तंदुरुस्त असणे खूप महत्वाचे आहे. स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, सध्याचा प्रत्येक खेळाडू आता जिममध्ये घाम गाळतो आणि जोमाने व्यायामही करतो. खेळाडूंच्या उत्कृष्ट तंदुरुस्तीचा परिणाम असा आहे की आता खेळाडू मैदानात त्यांचे १०० टक्के योगदान देताना दिसत आहेत.
क्रिकेटमध्ये जसे फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेली कामगिरी महत्त्वाची असते तशीच क्षेत्ररक्षकाचीही असते. क्षेत्ररक्षक जितक्या धावा आडवतो, तेवढाच फायदा त्याच्या संघाला होत असतो. त्यामुळे मैदानावर त्याची चपळता आणि चाणाक्षपणा महत्त्वाचा ठरतो. यासाठी तो तंदुरुस्त असणेही आवश्यक असते.
सध्याच्या काळात असे अनेक क्रिकेटपटू आहेत जे क्षेत्ररक्षण करताना स्वत:ला झोकून देतात. अनेकदा अशक्य असे झेल घेतात. अशाच ५ खेळाडूंबद्दल या लेखात जाणून घेऊया जे येत्या आयपीएल २०२० मध्ये त्यांच्या शानदार क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करू शकतात. यावर्षी १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये आयपीएल होणार आहे.
आयपीएल २०२० मध्ये क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत सर्वांचे लक्ष असेल या ५ खेळाडूंकडे.
१. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)
रवींद्र जडेजा आपल्या जबरदस्त क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. त्याला मैदानावर उत्तम झेल घेताना आपण बऱ्याचदा पाहिलं आहे. तसेच त्याचा थ्रोही उत्कृष्ट आहे. तो सीमेवर चेंडू अडविण्यातही पारंगत आहे. तसेच तो चेंडूच्या मागे खूप वेगाने जाऊन चेंडू अडवतो. जेव्हा जेव्हा त्याला डाइव मारण्याची संधी मिळेल तेव्हा तो कसलाही विचार करत नाही.
रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतो. गेल्या अनेक वर्षांपासून तो या संघात आहे. त्याने फलंदाजीसोबत गोलंदाजीनेही या संघाला मोलाचे योगदान दिले आहे. त्याचबरोबर आपल्या शानदार क्षेत्ररक्षणाने तो बर्याच धावांची बचत करतो. या खेळाडूला सध्या जगातील नंबर एकचा फील्डर मानले जाते.
२. ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आयपीएल २०२० च्या लिलावामध्ये १० कोटी ७५ लाख रुपयांच्या किंमतीला विकत घेतले. यापूर्वीही ग्लेन मॅक्सवेल किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळला आहे. तसेच, त्याने आयपीएल २०१७ मध्ये या संघाचे नेतृत्वही केले आहे.
१९ डिसेंबर रोजी झालेल्या आयपीएल २०२० च्या लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंची बोली लागली. आयपीएल २०२० च्या लिलावात ग्लेन मॅक्सवेल दुसर्या क्रमांकाचा महागड्या खेळाडू होता. त्याच्या स्फोटक फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजीबरोबरच किंग्ज इलेव्हन पंजाबलाही क्षेत्ररक्षणात मोठ्या आशा आहेत. मॅक्सवेलची जबरदस्त झेल घेण्याची क्षमता आहे.
३. बेन स्टोक्स (Ben Stokes)
इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सचा फिटनेस कमालीचे आहे. तो सध्याच्या काळातील सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटूंपैकी एक आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच तो संघाला क्षेत्ररक्षणातही महत्वाचे योगदान देतो.
विश्वचषक २०१९ च्या पहिल्या सामन्यादरम्यान बेन स्टोक्सने आपली उत्तम कामगिरी दाखविली होती. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अँडी फ्लुकोएचा अप्रतिम झेल पकडला. त्याला सध्याचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू देखील म्हटले जाते.
इंग्लंडला २०१९ चा विश्वचषक जिंकून देण्यात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यावेळी त्याचे अफलातून क्षेत्ररक्षणही पहायला मिळाले होते. आयपीएल २०२० मध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसून येईल आणि प्रत्येकजण त्याच्याकडून फलंदाजी आणि गोलंदाजीबरोबर चांगल्या क्षेत्ररक्षणाचीही अपेक्षा करेल.
२. डेव्हिड मिलर (David Miller)
डेव्हिड मिलर हा उत्तम खेळाडू आहे. फलंदाजी करताना तो वेगाने धावून धावा करतो. तसेच, त्याचे क्षेत्ररक्षणही उत्कृष्ट आहे.
आतापर्यंत डेव्हिड मिलर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसला. मात्र, आयपीएल २०२० मध्ये तो पहिल्यांदाच दुसर्या संघातून म्हणजे राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे.
त्याने आयपीएलचे ७९ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ३४.२६ च्या उत्कृष्ट सरासरीने १८५० धावा केल्या आहेत. या काळात डेव्हिड मिलरचा स्ट्राइक रेट १३८.७८ आहे. डेव्हिड मिलरने आयपीएलमध्ये ९ अर्धशतके आणि १ शतक झळकावले आहे. त्याने आयपीएलमध्ये १२६ चौकार आणि ८७ षटकार लगावले आहेत. याव्यतिरिक्त मिलर हा एक उत्तम क्षेत्ररक्षक म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे त्याच्याकडून आयपीएल २०२० मध्येही उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पहायला मिळण्याची सर्वांना अपेक्षा असेल.
१. विराट कोहली (Virat Kohli)
आरसीबीचा कर्णधार विराट कोहली त्याच्या शानदार फलंदाजीसाठी ओळखला जातो, पण त्याचा फिटनेसही जबरदस्त आहे. त्याच्या तंदुरुस्तीमुळे तो बर्याच खेळाडूंसाठी एक उदाहरण आहे. एका टीव्ही कार्यक्रमात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने खुलासा केला की तो प्रशिक्षण दरम्यान जिममध्ये सुमारे ४ तास वेळ घालवितो.
महत्त्वाचे म्हणजे कोहली आपल्या फिटनेसबाबत खूप सावध आहे आणि कोणत्याही प्रकारचे तळलेले, भाजलेले आणि जास्त मसालेदार पदार्थ खात नाही. म्हणून त्याची फिटनेस मैदानावर उपयुक्त ठरते. आतापर्यंतच्या सर्व आयपीएलमध्ये तो जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना दिसला आहे आणि यावेळी संघाला त्याच्याकडूनही अशीच अपेक्षा असेल.
ट्रेंडिंग लेख –
या क्रिकेटरला पुढचा इयान बाॅथम असं म्हटलं जायचं, पण वैयक्तिक संकटांमुळे…
आयपीएल २०२० मध्ये ह्या ५ अष्टपैलू खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष
क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ऍशेज
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल संघमालकांना वाटतेय भीती; म्हणतात, एक चूक आणि नष्ट होईल स्पर्धा
कोरोना काळात क्रिकेटचे आयोजन करणाऱ्या इंग्लंडचे होतेय कोटींचे नुकसान; बोर्ड घेणार मोठा निर्णय
६ वर्षांपासून आयपीएलमध्ये न खेळणाऱ्या पुजाराच्या नावावर आहे हा मोठा विक्रम; विराट- रोहितही आहेत मागे