जगभरातील लोकप्रिय आणि सर्वात मोठी टी२० लीग असणाऱ्या आयपीएलमध्ये अनेक धुरंदर गोलंदाज खेळतात. त्यातील श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आणि भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग हे असे क्रिकेटपटू आहेत, जे आयपीएलच्या पहिल्या हंगामापासूनच (२००८) उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. या दोन्ही गोलंदाजांनी आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्स संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यात त्यांनी मुंबई इंडियन्सला आयपीएलचे ४ विजेतेपदक (२०१३, २०१५, २०१७, २०१९) जिंकून देण्यातही मोलाचा वाटा उचलला आहे.
याव्यतिरिक्त मलिंगा आणि हरभजनच्या नावावर सर्वाधिक संघांविरुद्ध कमीत कमी २० विकेट्स घेण्याचा एक अनोखा विक्रमही आहे.
मलिंगा आणि हरभजनच्या यादीत ३ संघाचा समावेश
मलिंगा आणि हरभजनने सर्वाधिक संघांविरुद्ध घेतलेल्या कमीत कमी २० विकेट्समधील ४ संघांपैकी ३ संघ हे कॉमन आहेत. दोघांनीही चेन्नई सुपर किंग्ज, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि डेक्कन चार्जर्स संघांविरुद्ध हा कारनामा केला आहे. सोबतच मलिंगाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आणि हरभजनने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध २० विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २००९ चे विजेतेपदक जिंकणारा डेक्कन चार्जर्स संघ आता आयपीएलचा भाग नाही. या संघाच्या जागी आता हैद्राबादची फ्रँचायझी सनरायजर्स हैद्राबाद संघ आला आहे.
मलिंगाने घेतल्यात सर्वाधिक विकेट्स
आयपीएलमध्ये मलिंगाच्या नावावर सर्वाधिक १७० विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. तो सध्याचा सार्वकालिन पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते) जिंकणारा गोलंदाज आहे. सोबतच त्याच्या नावावर सर्वाधिक वेळा एका डावात ४ विकेट्स घेण्याचा विक्रमही आहे. मलिंगाने एकूण ६ वेळा एका डावात ४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त केकेआर संघाकडून खेळणारा फिरकीपटू सुनिल नरेननेही ६ वेळा ४ विकेट्स घेतल्या आहेत.
सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत हरभजन आहे तिसऱ्या क्रमांकावर
सध्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणारा हरभजन आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज आहे. त्याने १६० सामने खेळताना २६.४४ च्या सरासरीने १५० विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचाही विक्रम आहे. त्याने आतापर्यंत १२४९ निर्धाव चेंडू टाकले आहेत.
आयपीएलच्या १३ व्या हंगामाला येत्या १९ सप्टेंबरपासून यूएईत सुरुवात होणार असून यातील अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळला जाईल.
ट्रेंडिंग लेख-
-तिशीतच आयर्लंडचा दिग्गज झालेला पॉल स्टर्लिंग
-काय तर, बेल्स हरवल्यामुळे सामना सुरु झाला नाही!
-वयाची चाळीशी जवळ आली तरी ‘या’ क्रिकेटरची नाही तोड, नोंदवलाय टी२० कारकिर्दीतील मोठा पराक्रम
महत्त्वाच्या बातम्या-
-सौरव गांगुलीला कठिण काळात प्रणव मुखर्जींनी दिले होते समर्थन; म्हणाले होते…
-किंग्स इलेव्हन पंजाबचा धुरंदर म्हणतोय, आयपीएलमध्ये न खेळण्यापेक्षा नियमांचे पालन करणे बरे
-१२.५कोटी रुपयांना संघात विकत घेतलेल्या खेळाडूविषयी वाटतेय राजस्थान रॉयल्सला चिंता, कारण घ्या जाणून