बीसीसीआयने एप्रिल-मे महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामची तयारी सुरु केली आहे. या हंगामासाठीच्या लिलावाची तारीख जाहीर झाली असून आता बीसीसीआय नवीन प्रायोजकच्या शोधात असल्याचे समजते आहे. चीनी स्मार्टफोन कंपनी विवोने २०२० साली माघार घेतल्यानंतर आयपीएलला सध्या कोणीही मुख्य प्रायोजक नाही.
त्यामुळे आता बीसीसीआय नवीन प्रायोजकत्वासाठी लवकरच टेंडर जरी करणार असल्याचे वृत्त आहे. तसेच यावेळी प्रायोजकांमार्फत अधिक नफा कमावण्याचे उद्दिष्ट बाळगते आहे.
मागील वर्षी भारत-चीन यांच्यातील ताणलेल्या राजनैतिक संबंधांमुळे बीसीसीआयला प्रायोजकत्वाच्या बाबतीत अडचणींचा सामना करावा लागला होता. तेराव्या हंगामाला काही आठवडे शिल्लक असताना बीसीसीआयला नवीन प्रायोजक शोधावा लागला होता. आधीचे प्रायोजक विवोने एका हंगामासाठी बोर्डाला ४४० कोटी रुपये देण्याचा करार केला होता. मात्र नवीन प्रायोजक असलेल्या ड्रीम इलेव्हनने केवळ २२२ कोटींचा करार केला होता. त्यामुळे बीसीसीआयचे नुकसान झाले होते.
मात्र यावेळी बीसीसीआय लवकरात लवकर प्रायोजकाचा शोध घेण्याच्या विचारात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विवोला पुन्हा एकदा शीर्ष प्रायोजकत्व देण्याची बीसीसीआयची तयारी आहे, मात्र चीनच्या सीमेवरील तणाव लक्षात घेता ते सद्यस्थितीत शक्य नाही. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आयपीएल २०२०चा करार जवळपास मुल रकमेच्या अर्धा होता. त्यामुळे तो करार पुढे कायम राखणे बोर्डाला शक्य नाही. तसेच विवोला पुन्हा एकदा प्रायोजकत्व देणे शक्य नाही. अशा परिस्थितीत नवीन टेंडर बाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.
मात्र आता आयपीएल २०२१च्या लिलावाच्या वेळी बीसीसीआयकडे कुठलेही शीर्ष प्रायोजक नसतील. लिलावासाठी केवळ तीन आठवडे बाकी असताना प्रायोजकांबाबत अंतिम निर्णय घेणे शक्य नाही. बीसीआयकडे मागील हंगामाचे मुख्य प्रायोजक ड्रीम इलेव्हनशी नवीन कराराबाबत बोलणी करण्याचा पर्याय देखील खुला आहे. अर्थात ड्रीम इलेव्हनने मागील हंगामापेक्षा कराराची रक्कम वाढवून देण्यास नकार दिल्यास ही बोलणी पुढे जाणार नाहीत. विवोच्या करारातील किमान ४४० कोटींची रक्कम असल्याशिवाय बीसीसीआय कराराबाबत फारशी उत्सुक नसेल. त्यामुळे येत्या काळात मुख्य प्रायोजकाचा मान कोण पटकाविणार, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
महत्वाच्या बातम्या:
आरसीबीने संघातून सोडल्यानंतर या खेळाडूची सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चौकार-षटकारांची आतीषबाजी
ऐकावं ते नवलंच! भारतातील या दोन क्रिकेट स्टेडियममध्ये आहे गणपतीचे मंदिर