अनुभवी ऑक्शनर ह्यूज एडमीड्स (Huge Edmeades) यांच्या आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाची जबादारी सोपवली गेली होती. परंतु मेगा लिलावादरम्यान अचानक एडमीड्स यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. अशात चारू शर्मा (charu sharma) यांनी एडमीड्सच्या जागी ऑक्शनरची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली. याचा कारणास्तव चारू यांची सर्वत्र चर्चा होत आहे, अनेकांनी त्यांचे कौतुकही केले. आता त्यांनी स्वतः आयपीएल लिलावात ऑक्शनरची भूमिका पार पाडण्याची संधी कशी मिळाली, याविषयी माहिती दिली आहे.
आयपीएलचा २०२२ साठी बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव आयोजित केला होता. मेगा लिलाव बेंगलोरच्या एका हॉटेलमध्ये पार पडला. लिलावात २०० पेक्षा अधिक खेळाडूंवर बोली लागली आणि आयपीएल फ्रेंचायझींनी स्वतःचे संघ तयार केले.
पण हा लिलाव सुरू असतानाच दिग्गज एडमीड्स बेशुद्ध होऊन जेव्हा खाली पडले, तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. परंतु, थोड्याच वेळात चारू शर्मांनी ऑक्शनरची भूमिका स्वीकारली आणि ती उत्कृष्टपणे पारही पाडली. स्पोर्टस्टारशी बोलताना चारूंनी सांगितेल की, त्यांना हॉटेलमध्ये पोहोचण्यासाठी १५ ते २५ मिनिटांचा वेळ मिळाला होता.
चारु शर्मा म्हणाले की, ‘मला माझा मित्र ब्रिजेश पटेलचा फोन आला. त्यावेळी मी माझ्या कुटुंबियांसोबत जेवण करत होतो. तेवढ्यात ब्रिजेशचा फोन आला आणि तो मला म्हणाला की, तू जे काही करत आहे, ते सगळ सोड आणि तत्काळ हॉटेलमध्ये पोहोच. फक्त कपडे घाल आणि ये. जिथे आयपीएल लिलाव सुरू होता, तिथून माझे घर जास्त लांंब नव्हते. अशात मला लिलावाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी १५ ते२० मिनिट लागले.’
पुढे बोलताना चारू म्हणाले की, ‘मी देखील ऑक्शन करतो आणि यातील काही लहान लहान गोष्टी लक्षात घेऊन प्रक्रिया पूर्ण केली जाते. ऑक्शनरची भूमिका स्वीकारण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नसते. ही गोष्ट प्रक्रियेसोबत आपोआप होत राहते.’
दरम्यान, लिलावाच्या दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात एडमीड्स यांनी ऑक्शनरची जबाबदारी पुन्हा सांभाळली. ज्यावेळी एडमीड्सचे हॉलमध्ये आगमन झाले, तेव्हा उपस्थित सर्वजण उभे राहून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू लागले होते. एडमीड्सने आतापर्यंत जगातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये २७०० पेक्षा अधिक महत्वाचे लिलाव पार पाडले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल लिलावात कोट्याधीश होताच ‘या’ इंग्लिश खेळाडूने सोडली पीएसएल
स्वतः कर्णधार रोहित म्हणतोय, “आयपीएल नाही देशासाठी खेळण्यावर लक्ष द्या”; वाचा सविस्तर