जळगाव जिल्ह्या कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने महर्षी वाल्मिकी शैक्षणिक व सामाजिक क्रीडा सांस्कृतिक मंडळ जळगाव यांच्या सौजन्याने ६७ वी पुरुष व महिला गट जळगाव जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०१९ चा आयोजन करण्यात आलं आहे .
सदर जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा शनिवार दिनांक. ७ डिसेंबर २०१९ व रविवार दिनांक. ०८ डिसेंबर २०१९ या कालावधीत पार पडेल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव जी. जळगाव येथे होईल. सदर स्पर्धा मॅटवर खेळण्यात येईल. पुरुष गटाचे ४२ तर महिला गटाचे २० संघ सहभागी होतील
जळगाव जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धातुन निवडलेला संघ चिपळूण येथे १९ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०१९ दरम्यान होणाऱ्या वरीष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल.