भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने आयोजित करत असलेल्या नामांकित इंडियन प्रीमीयर लीगच्या 14 व्या मोसमास 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. यावर्षी आयपीएल 2021 चे आयोजन भारतात केले असून अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथील स्टेडियमवर 30 मे पर्यंत हा हंगाम होणार आहे. त्याअगोदर आयपीएलच्या 13 व्या सत्रात सर्वात खालील स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्ससाठी एक नवीन वाईट बातमी समोर आली आहे.
राजस्थान रॉयल्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यंदाच्या 14 व्या आयपीएल हंगामातील पहिल्या काही सामन्यांना मुकणार आहे. त्याबद्दल इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पुष्टी केली आहे. त्याला उजव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे आता तो भारताविरुद्धची टी20 मालिका संपल्याने इंग्लंडला परत जाणार आहे. तिथे इंग्लंड संघाचे वैद्यकीय पथक त्यावर उपचार करेल. त्यामुळे आर्चरला भारताविरुद्धची अगामी वनडे मालिका आणि आयपीएल 2021मधील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागणार आहे.
राजस्थानसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण आर्चर हा त्यांच्या संघातील मुख्य गोलंदाजांपैकी एक आहे. तसेच राजस्थानसाठी मागील हंगाम अत्यंत खराब ठरला होता. त्यानंतर या हंगमातून त्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. अशातच आर्चरची पहिल्या काही सामन्यांसाठीची अनुपस्थिती त्यांच्यासाठी नुकसानीची ठरु शकते.
जोफ्रा आर्चरने 13 व्या आयपीएल हंगामात 14 सामन्यांत 20 बळी घेतले होते. तसेच आर्चरने आत्तापर्यंत 35 आयपीएल सामने खेळले आहेत. त्यात त्याने 46 बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी १४ जणांच्या इंग्लंड संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
सचिनने मारली लाराला स्कुटीवरून रपेट, दिला ‘हा’ खास संदेश, पाहा व्हिडिओ
पुण्यात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेचे ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक