क्रिकेटच्या मैदानावर बरेच विक्रम बनवले जातात आणि मोडले जातात. मात्र, काही विक्रम असे आहेत ज्यापर्यंत पोहोचणे अवघड आहे. अशाच एका विक्रमाची नोंद ९ जुलै १९६५ या दिवशी इंग्लंडच्या जॉन एड्रिक यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करताना केली होती. हेडिंग्ले येथे केलेल्या त्यांच्या नाबाद ३१० धावांच्या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या खेळीच्या एकूण धावांपैकी ७७ टक्के धावा चौकार षटकारांच्या मदतीने काढल्या. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेचा हा तिसरा कसोटी सामना ८ जुलैपासून सुरू झाला होता आणि एड्रिक हे सलामीवीर म्हणून मैदानात उतरले होते.
एड्रिक यांचा विश्वविक्रम
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा पहिला गडी १३ धावांवर बाद झाला. त्यानंतर एड्रिक आणि केन बॅरिंग्टन (१६३) यांनी दुसर्या गड्यासाठी ३६९ धावांची भागीदारी केली. बॅरिंग्टन यांनी २६ चौकारांच्या मदतीने १६३ धावा केल्या. २१ जून १९३७ रोजी ब्लोफिल्ड येथे जन्मलेल्या जॉन एड्रिक यांनी ४५० चेंडूतील आपल्या ३१० धावांच्या नाबाद खेळीत ५२ चौकार आणि ५ षटकार ठोकले. त्यांचा हा विश्वविक्रम आजतागायत कोणीही मोडू शकला नाही.
या सामन्यात इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ४ बाद ५४६ अशी मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे दोन्ही डाव १९३ व १६६ धावांवर संपुष्टात आले. या सामन्यात इंग्लंडने १८७ धावांनी मोठा विजय मिळवला.
भारताचा अनुभवी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग त्यांच्या विक्रमाच्या जवळ आला होता. मात्र, तोही हा विक्रम मोडू शकला नाही. सेहवागने लाहोर येथील सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ४७ चौकार ठोकले होते.
अशी राहिली एड्रिक यांची कारकीर्द
जॉन एड्रिक यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीत ७७ कसोटी सामने खेळले असून, त्यात १२ शतके आणि २४ अर्धशतकांच्या मदतीने एकूण ५१३८ धावा केल्या. त्यांनी आपल्या कारकीर्दीत फक्त ७ वनडे सामने खेळले ज्यात त्यांनी २ अर्धशतकांच्या मदतीने २२३ धावा केल्या. एड्रिक यांनी आपल्या मोठ्या ५६४ सामन्यांच्या प्रथमश्रेणी कारकिर्दीत एकूण ३९७९० धावा केल्या आहेत. कामचलाऊ गोलंदाज असले तरी त्यांना आपल्या कसोटी कारकिर्दीत एकही विजय मिळवता आला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
मराठीत माहिती- क्रिकेटर व्यंकटपथी राजू
भुवनेश्वर काय बटलरची पाठ सोडना!, गेल्या दोन्ही सामन्यात दियाल ‘गोल्डन डक’
पंत, कार्तिक, इशान?, दुसऱ्या टी२० सामन्यात कोणत्या यष्टीरक्षकाला संधी मिळणार?