नुकतीच इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १५व्या हंगामाची सांगता झाली. या हंगामात अनेक युवा प्रतिभावान खेळाडूंनी आपली चमक दाखवली. यामध्ये मुंबईचा तिलक वर्मा, चेन्नईचा मुकेश चौधरी आणि युवा सितारा ठरलेल्या हैदराबाद संघाच्या उमरान मलिकच्या नावांचा उल्लेख करता येईल. मात्र, या सर्व खेळाडूंमध्ये एक असा खेळाडू आहे, जो गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये आपले पदार्पण करण्याची वाटच पाहत आहे. त्या खेळाडूचे नाव अर्जून सचिन तेंडुलकर. याबाबत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी वक्तव्य केले आहे.
कपिल देव (Kapil Dev) यांना पत्रकारांशी संवाद साधत असताना प्रश्न विचारण्यात आला की, ‘सचिनचा मुलगा असून अर्जून तेंडुलकरला (Arjun Tendulkar) खेळण्याची संधी का मिळत नाही?’ यावर प्रतिक्रिया देताना कपिल म्हणाले की, “त्याला केवळ त्याच्या वडीलांच्या नावामुळे चांगला खेळण्याचा दबाव दिला जात आहे. अशावेळी त्याच्यावरील दबाव कमी करत त्याला त्याच्या शैलीनुसार खेळण्याची मुक्तता द्यायला हवी, त्यावेळी अर्जून एक खेळाडू म्हणून उत्तम कामगिरी करू शकेल.”
कपिल देव यांनी ही प्रतिक्रिया देत असताना डॉन ब्रॅडमनच्या मुलाचे उदाहरण दिले. “डॉन ब्रॅडमनच्या मुलाला वडीलांच्या प्रतिष्ठेचा दबाव सहन न झाल्याने त्याने आडनाव काढून टाकले होते. त्याचप्रमाणे सचिनच्या मुलानेही सचिनसारखा खेळ करावा असा सध्या त्याच्यावर दबाव आहे. माझ्या मते अर्जून सचिनच्या तुलनेत ५० टक्के तरी चांगला खेळ करू शकला, तरी तो एक उत्तम खेळाडू होऊ शकेल.”
दरम्यान, अर्जून तेंडूलकर गेल्या २ वर्षांपासून आयपीएलमधील सर्वात यशस्वी असलेल्या मुंबई इंडियन्स संघात सामील आहे. २०२० साली संघाने अर्जूनला २० लाख तर, २०२२च्या लीलावात ३० लाख रुपये देत खरेदी केले होते. अर्जून मुंबईच्या संघाकडून सैयद मुश्ताक अली चषकामध्ये केवळ दोन सामने खेळला आहे. त्यामुळे अर्जूनला त्याच्या खेळात सुधारणा करण्यासाठी आणखी थोडा वेळ द्यावा असे क्रिकेट जाणकारांचे मत आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत खेळण्यासाठी ‘हा’ खेळाडू उत्सुक, वेळ दिल्याने बीसीसीआयलाही म्हटले थँक्यू
मिशेल आणि ब्लंडेल जोडीची विक्रमतोड भागीदारी, १८ वर्षांनंतर ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती
पाकिस्तानला हरवत बक्षीस म्हणून मिळालेली ‘ऑडी १००’ पाहून शास्त्री भावूक, ३७ वर्षांनंतर पाहिली कार