सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात गुरुवारी आयपीएलचा २२वा सामना पार पडला. या सामन्यात हैदराबादचे सलामीवीर डेविड वॉर्नर व जॉनी बेअरस्टोने धमाकेदार शतकी सलामी दिली. याचबरोबर वॉर्नरने एक खास विक्रमही आपल्या नावावर केला.
सलामीला येत शतकी भागीदारी करणाऱ्या खेळाडूंमध्ये वॉर्नर पहिल्या स्थानी आला आहे. त्याने आयपीएलमध्ये शिखर धवनबरोबर तब्बल ६ वेळा शतकी भागीदारी केली तर आता याच यादीत दुसऱ्या स्थानावर वॉर्नर- बेअरस्टो आले आहे. त्यांनी १६ डावांत तब्बल पाचव्यांदा सलमीला शतकी भागीदारी केली आहे. आता सलामीला येत शतकी भागीदारी करण्याचे दोनही विक्रम वॉर्नरच्या नावावर आहेत.
प्रथम फलंदाजी करताना डेविड वॉर्नर व जॉनी बेअरस्टो जोडीने १५.१ षटकांत १६० धावांची सलामीला भागीदारी केली. यात एकट्या बेअरस्ट्रोने ९७ धावा केल्या. वॉर्नरला बाद करत रवी बिष्णोईने ही भागीदारी मोडली.
याबरोबर तब्बल ३६.३ षटकं व ८ दिवसांनी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला विरोधी संघाची विकेट घेतली आहे. यापुर्वी १ ऑक्टोबरला पंजाबच्या गोलंदाजांनी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला बाद केले होते. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्यांना एकही विकेट घेता आली नाही. त्या सामन्यात चेन्नईकडून शेन वॉटसन व फाफ डुप्लेसीने नाबाद खेळी करत संघाला १० विकेट्सने विजय मिळवून दिला होता. आज १६० धावा झाल्यानंतर पंजाबच्या गोलंदाजांनी सलामीची भागीदारी मोडली.
या दरम्यान ३६.३ षटकांत विरोधी संघाने पंजाबविरुद्ध ४०८ धावा, ४० चौकार व १६ षटकार मारले.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘केदार जाधवला सामनावीराचा पुरस्कार द्या’, चेन्नईच्या पराभवानंतर माजी खेळाडूची खोचक टीका
-केदार जाधवची सीबीआय चौकशी करा, चाहत्यांनी केली अजब मागणी
-दुःखद ! आर अश्विनच्या संघसहकाऱ्याने घेतला जगाचा निरोप
ट्रेंडिंग लेख-
-यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ ३ संघांकडे आहे सर्वोत्तम गोलंदाजीचे आक्रमक
-IPL2020 – या ६ युवा खेळाडूंनी केले सर्वांना प्रभावित, लवकरच मिळू शकते टीम इंडियाकडून खेळण्याची संधी
-IPL – एकही विकेट न गमावता सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारे संघ