भारतीय क्रिकेट संघाचा तसेच मुंबई इंडियन्सचा प्रमुख फलंदाज सुर्यकुमार यादव ज्याने आपल्या उत्कृष्ट खेळाने सर्वांचे मन जिंकले आहे. शुक्रवारी रंगलेला मुंबई इंडियन्स वि गुजरात टायटन्स सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर खेळला गेला. तर या सामन्यादरम्यान दोन्ही संघामध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली. यावेळी वानखेडे स्टेडियमवर सूर्यकुमारने अवघ्या 49 चेंडूत 103 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 11 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. तर चला आज जाणून घेऊ सुर्यकुमारची संघर्षकथा.
यशाच्या शिखर गाठण्यासाठी सर्वांना संघर्ष करावा लागतो त्यातीलच एक आहे ‘स्काय’ म्हणजेच सूर्यकुमार यादव. (suryakumar yadav Latest News) सुर्याचा जन्म मुंबईत झाला असून त्याने लहान वयातच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. खेळाची आवड असली तरी त्याला वाटेत अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. आवड जपण्यासाठी घरातील सदस्यांचा पाठिंबा असणे खुप महत्वाचे असते. मात्र, सुर्याच्या बाबतीत ते घडले नाही त्याला क्रिकेटमध्ये भविष्य बनविण्यासाठी आधी परिवाराशी लढावे लागले. परिवाराकडून पाठिंबा नसल्यामुळे त्याला क्रिकेट क्षेत्रात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
सुर्याचे वडील पोलिस अधिकारी होते आणि त्यांना त्यांच्या मुलाची क्रिकेटची आवड मान्य नव्हती. सूर्याला क्रिकेट खेळण्यासाठी बऱ्याचदा घराबाहेर पडावे लागले आणि अनेकदा मित्रांकडून खेळासाठीचे साहित्य उधार घ्यावे लागले. यामुळे त्याला क्रिकेटसाठी सराव करणे आणि त्यात कौशल्य मिळवणे कठीण जायचे. परंतु, सूर्यकुमारला क्रिकेट खेळण्याची तीव्र इच्छा होती आणि त्याने ते आपले करियर बनवण्याचा निर्धार केला होता. घरातील नकारांना न जुमानता सूर्याने आपली आवड आणि आपला खेळ सुधारण्यासाठी मेहनत घेतली. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तो विविध स्थानिक संघांसाठी खेळला आणि अखेरीस त्याने मुंबई क्रिकेट संघात आपले स्थान मिळवले.
अनेक वर्ष देशांतर्गत क्रिकेट गाजवल्यानंतर राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला. अनेकदा त्याच्याकडे दुर्लक्ष देखील करण्यात आले. नक्कीच हा काळ त्याच्यासाठी कठीण होता कारण त्याने त्या स्तरावर पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला होत, पण यातूनही त्याने हार मानली नाही. पुढे सुर्याने सतत सराव करत स्वत:ला उत्कृष्ट बनविले.
त्याने आणखी मेहनत केली आणि त्याला यश देखील आले. सूर्यकुमारची मेहनत आणि जिद्द फळाला आली, जेव्हा त्याला स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी मिळाली. सुर्याने 2012 ला आयपीएलमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर 2021 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या टी20 सामन्यात सुर्याने भारतीय राष्ट्रीय संघासाठी पहिल्यांदा पदार्पण केले. तब्बल 10 वर्ष त्याला भारतीय टीममध्ये येण्यासाठी दिवस रात्र मेहनत घ्यावी लागली. यावेळी सामन्यादरम्यान, त्याने त्याच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावून सर्वांना प्रभावित केले. तेव्हापासून, सूर्यकुमार भारतीय संघातील एक नियमित खेळाडू बनला, आणि तो भारतीय संघातील सर्वात विश्वासार्ह खेळाडू बनला ठरला.
खरंतर सूर्याची कथा ही केवळ संघर्षाची नाही, तर त्याच्या जिद्द आणि चिकाटीचीही आहे. सुर्याला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला पण भारतासाठी क्रिकेट खेळण्याचे त्याचे स्वप्न कधीच सोडले नाही. त्याच्या याच संघर्षांमुळे तो आत्ता एक मजबूत आणि अधिक दृढनिश्चयी खेळाडू बनला आहे. सूर्या सर्वांसाठी एक उदाहरण बनला आहे की, मेहनत आणि जिद्द असेल तर काहीही शक्य आहे. भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक युवा क्रिकेटपटूंसाठी त्याचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरेल. यश मिळवणे सोपे नाही, परंतु कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने आपण कोणत्याही अडथळ्यावर मात करून आपले ध्येय साध्य करू शकता.
(Life Story Of Suryakumar Yadav From Begining To Now)