भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी (२० फेब्रुवारी) १२ मार्चपासून इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या टी२० मालिकेसाठी १९ जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघात ४ नवीन चेहऱ्यांना संधी दिली असून जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली आहे. भारतीय संघात संधी मिळालेल्या नवीन चेहऱ्यांमध्ये सुर्यकुमार यादवचाही समावेश आहे. त्यामुळे सध्या त्याच्याबाबतीत सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
सुर्यकुमारशिवाय राहुल तेवतिया, इशान किशन आणि वरुण चक्रवर्ती या नवीन चेहऱ्यांना भारतीय संघात संधी मिळाली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी न मिळाल्याने आला होता चर्चेत
खरंतर मागील अनेक महिन्यांपासून चाहत्यांसह काही दिग्गजांनी सुर्यकुमारला भारतीय संघात संधी मिळावी अशी मागणी केली होती. त्याला आयपीएल २०२० चा हंगाम सुरु असताना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झालेल्या कोणत्याच क्रिकेट प्रकारच्या भारतीय संघात निवडण्यात आले नव्हते.
त्यानंतर अनेकांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. चाहत्यांनी सुर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड न केल्याने विराटवरही निशाणा साधला होता. तसेच मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरही तो ट्रेंड झाला होता. अनेक दिग्गजांनी त्याला भारतीय संघात स्थान मिळायला हवे होते, असे म्हटले होते.
अखेर सुर्यकुमारची इंग्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली असून आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा तो सोशल मीडियावर चर्चेत आला असून त्याच्याबद्दल अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.
एका चाहत्याने एक मजेदार मीम शेअर केले आहे, ज्यात अमरिश पुरी आणि फरिदा जलाल हात जोडून उभे आहेत. तसेच त्यांच्या फोटोवर लिहिले आहे की ‘आखिर वो दिन आ ही गया (अखेर तो दिवस आलाच)’. तसेच अनेकांनी सुर्यकुमारचे अभिनंदनही केले आहे.
#SuryakumarYadav
After watching he is selected in national team his parents reaction pic.twitter.com/pQ1NP31OOg— Tushar being Indian (@TusharbeingInd1) February 20, 2021
when you see#IshanKishan #SuryakumarYadav #RahulTewatia #VarunChakravarthy
In indian t20 squade against Eng.
As a fan: pic.twitter.com/P8UFrWlq2B— RJ Mahtab Khan (@Mahtab_khan7349) February 20, 2021
https://twitter.com/mukesh_18s/status/1363176268351434752
https://twitter.com/DhinaaDhinnDhaa/status/1363176131902402562
Congratulations Suryakumar Yadav 🔥❣️#suryakumaryadav #ishankishan #SachinTendulkar pic.twitter.com/oYhilD07lM
— Sachin Born To Win (@SachinBornToWin) February 20, 2021
https://twitter.com/adarsh_018/status/1363178076633358336
#SuryakumarYadav pic.twitter.com/JEhh92FEMU
— BABA श्याम (@babashyam3) February 20, 2021
#SuryakumarYadav to Virat Kohli : pic.twitter.com/auSBAzwykZ
— UmdarTamker (@UmdarTamker) February 20, 2021
#SuryakumarYadav #INDvsENG
Surya kumar Yadav and Ishan kishan added Into T20 Squad Against England💥🏌️Meanwhile MI fans :: pic.twitter.com/4Iaryyfqev
— 마륵 타망 ⚡⚡ (@_Marktamang) February 20, 2021
सुर्यकुमारची कारकिर्द –
सुर्यकुमारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७७ सामन्यात ४४च्या सरासरीने ५३२६ धावा केल्या आहेत. अ दर्जाच्या ९३ सामन्यात त्याने ३५.४६च्या सरासरीने २४४७ धावा केल्या आहेत तर ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारात त्याने १७० सामन्यात ३१.५६ च्या सरासरीने ३५६७ धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये १०१ सामने खेळलेल्या सुर्यकुमारने ३०.२० च्या सरासरीने २०२४ धावा केल्या आहेत.
मोटेरा स्टेडियमवर होणार सामने –
भारत विरुद्ध इंग्लंड संघात होणारे सर्व ५ टी२० सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहेत. या मालिकेला १२ मार्चपासून सुरुवात होणार असून १४, १६, १८ आणि २० मार्चला अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा सामना खेळला जाणार आहे.
टी२० मालिकेसाठी भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.
महत्त्वाच्या बातम्या –
तपश्चर्या आली फळाला! तब्बल १२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सुर्यकुमार यादवला भारतीय संघात मिळाले स्थान